Latest Posts

क्रीडा क्षेत्रात गुणवत्ता सिद्ध करून आपली प्रगती करा : माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम

– लगाम येथे भव्य टेनिस बॉल (३० सर्कल) रात्रकालीन क्रिकेट सामन्याचा उद्घाटन संपन्न.
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / मूलचेरा (Moolchera) : मूलचेरा तालुक्यातील लगाम येथे जय सेवा ७५० क्रिकेट क्लब लगाम यांच्या सौजन्याने बाजारवाडी पटांगणात भव्य टेनिस बॉल (३० सर्कल) रात्री कालीन क्रिकेट सामन्याच उद्घाटन माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी स्पर्धकांना संबोधित करतांना राजे म्हणाले आपल्या अहेरी विधानसभा क्षेत्रातील युवक क्रिकेट, फूटबॉल, कब्बडी, व्हॉलीबॉल, असे अनेक खेळ मोठ्या उत्साहात खेळतात. आपल्या क्षेत्रातील युवकांमध्ये क्रीडा क्षेत्राच्या बाबतीत भरपूर गुणवत्ता आहे. त्यामुळे युवकांनी क्रीडा क्षेत्रात आपली गुणवत्ता सिद्ध करत, आपली प्रगती क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून करावी आणि आपल्या क्षेत्राचे नावलौकिक करावे असे, मत यावेळी माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी व्यक्त केले.

भव्य टेनिस बॉल (३० सर्कल) रात्रकालीन क्रिकेट सामन्याचा प्रथम पारितोषिक २० हजार १ रु. माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या कडून तर द्वितीय पारितोषिक १५ हजार १रु. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांच्या कडून देण्यात आले. मोठ्या संख्येने यावेळी क्रिकेट संघांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे तर प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते अवधेशरावबाबा आत्राम, सामाजिक कार्यकर्ते संतोष उरेते, पोलिस पाटील गिरमा मडावी, अमित गोविंदवार, प्रमोद चांदावार, राजू सोनटक्के, संतोष मोहूर्ले, महादेव सिडाम तसेच युवा वर्ग, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss