विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : श्री. पंचमुखी हनुमान मंदिर, माना टेकडी, पठाणपुरा, चंद्रपूर येथे भव्य पूजा व महाआरचे २० जानेवारी शनिवारीला आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात चंद्रपूरचे प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे चंद्रपूर सिटी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश सिंह, राजपूत आणि विशेष उपस्थिती एस.डी.पी.ओ. पोलीस विभाग कार्यालयाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी दिलीप कूर्जेकर व त्यांच्या पत्नी संगीता कूर्जेकर यांची होती.
उपस्थित रामभक्तांद्वारे राजपूत व कुर्जेकर दांपत्य यांना अयोध्या येथील श्रीरामांच्या भव्य मंदिराच्या दर्शन घेण्याकरिता अयोध्येच्या निमंत्रण व अक्षता देऊन आमंत्रित करण्यात आले.
या कार्यक्रमात राजपूत यांनी उपस्थित अतिथींचे योग्य मार्गदर्शन केले. त्यांनी मनाटेकडी येथील मंदिर व सुंदर नैसर्गिक सुंदरतेची स्तुती केली. नागरिकांच्या सहकार्यामुळे अनेक गुन्हे व अपघात आपण टाळू शकतो, असे त्यांनी उद्बोधित केले.
अनेक प्रकरण संयम व समन्वयंने सोडवता येतात. हे त्यांनी प्रत्यक्ष उदाहरण देऊन समजावून सांगितले. बरेच प्रकरण योग्य संपुदेशनाने मार्गी लागतात, असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात उल्लेख केले. पुढल्या पिढीवर उचित संस्कार करणे व त्यांना योग्य संस्कृती शिकवणे ही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे, असे त्यांनी उपस्थित सर्व अतिथिंना आवाहन केले.
श्री. पंचमुखी हनुमान मंदिर, माना टेकडी, पठाणपुरा, चंद्रपूर हे प्राचीन मंदिर आहे आणि अनेक भक्तांनी मंदिरात दर्शन घेण्यासाठी यावे, असे आव्हान मंदिर संचालकांद्वारे करण्यात आले.
या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह शैलेश पर्वते, चंद्रपूर जिल्हा शांतता समिती सदस्य ॲड. आशिष मुंधडा, ॲड. भुषण वांढरे, ॲड. नितीन गाटकिने, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे जिल्हा संघटक मंत्री चिन्मय भागवत, प्रणील नरमशेट्टीवार, अमित भारद्वाज, अमित राठोड, सुसेण मुंगेलवार, नामदेव राऊत, जयंत निमगडे, सुप्रित निकम, अमोल महाजन, राकेश बंडीवार, अरविंद सोनी, गणेश रासपल्ले, विकास कलिकुंदवार, पंकज झोडे व इतर मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात उपस्थित असल्याबद्दल सूसेन मुंगेलवार यांनी पोलीस निरीक्षक, वरिष्ठ पोलीस अधिकारी व गणमान्य नगिरकांचे आभार व धन्यवाद व्यक्त केले.