– माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वाखाली शिष्मंडळानी समस्या बाबत सविस्तर पणे चर्चा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : तालुक्यातील व्येंकटापूर येथील शासकीय आश्रम शाळा येथील इयत्ता १ ते ४ वर्ग सन २०१६ ला बंद झाले होते. येथील शाळा बंद झाल्याने त्या परिसरातील गावातील आदिवासी विध्यार्थ्यांची शैक्षणिक अधोगती नुकसान होत आहे.
इयत्ता १ ते ४ म्हणजे लहान मुली मुलांचे प्रगतीचे पहिले पाऊल असलेल्या शाळा जर बंद असल्यास त्या परिसरातील लोकांची सुद्धा फसवणूक होत आहे.
इयत्ता ५ ते १० वर्गांची शैक्षणिक परिस्थिती अत्यंत बिकट परिस्थिती आहे. शासकीय आश्रम शाळा व्येंकटापूर शाळा पूर्ण पणे बंद आहे. याची कारण हजर विध्यार्थ्यांचे योग्य लक्ष न देणे. विशेष म्हणजे त्या शाळेचे मुख्याध्यापक व कर्मचारी हे मुलांना शिवीगाळी करणे व तेथील शिक्षक वर्ग नेहमी गैर हजर राहणे. शाळांना शनिवारीला शाळा सोडून घरी जाणे. परत मंगळवारीला येणे. व विध्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करणे. अशा कारणाने शाळेची पटसंख्या कमी होत आहे.
या सर्व कारनाणे त्या शाळेतील मुख्याध्यापक – शिक्षक – कर्मचारी त्यांच्यावर योग्य कार्यवाही करून शाळा पुर्ववत सुरू करावी. पट संख्यात वाढ करण्यासाठी गावकऱ्यामार्फत आश्वासन देत गावकरी व सरपंच, पोलिस पाटील आणि गावातील प्रतिष्ठित नागरिका १००% टक्के योगदान देतील. व ग्राम पंचयतीमध्ये ठारव घेण्यात येईल असे सांगितले.
आज आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी तालुका दंड अधिकारी तथा सहायक प्रकल्प अधिकारी वाघमरे आदिवासी विकास विभाग यांची भेट घेवून चर्चा केली.
यावेळी अहेरीचे माजी सभापती भास्कर तलांडे, जि.प.माजी सदस्य अजय नैताम, सरपंच अक्षय पोरतेट, उपसरंपच चिरंजीव चीलवेलवार, माजी सरपंच मारोती मडावी, माजी सरपंच अशोक येलमुले, वासुदेव सिडामसह आदी उपस्थित होते.