Latest Posts

राज्यातील ९६ तर सोलापूर जिल्ह्यातील २३ कारखान्यांनी थकवली एफआरपी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / सोलापूर (Solapur) : साखर कारखान्यांचे पट्टे पडून दोन महिन्यांचा कालावधी लोटला, मात्र शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे चुकते झाले नाहीत. राज्यातीत ९६ कारखान्यांनी १ हजार ८१४ कोटी, तर जिल्ह्यातील २३ कारखान्यांनी २८५ कोटी रुपये अडकवले आहेत.

६० टक्क्यांपर्यंत उसाचे पैसे न दिलेल्या राज्यातील साखर कारखान्यांची संख्या १५ आहे. एफआरपीनुसार शेतकऱ्यांचे पैसे दिलेले राज्यातील २९ साखर कारखाने आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील सिद्धेश्वर सोलापूर, लोकनेते बाबूराव अण्णा पाटील, विठ्ठल कॉर्पोरेशन म्हैसगाव, इंद्रेश्वर शुगर बार्शी, भैरवनाथ विहाळ, भैरवनाथ आलेगाव, जय हिंद आचेगाव, धाराशिव शुगर सांगोला या साखर कारखान्यांचा समावेश आहे.

उसाचे संपूर्ण पैसे दिलेले १३ साखर कारखाने असून १० कारखान्यांनी ९० टक्क्यांपर्यंत पैसे दिले आहेत.

Latest Posts

Don't Miss