Latest Posts

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षकाविरूध्द नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली सापळा कारवाई

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर येथे समक्ष येवून तकार नोंद केली की, तक्रारदार यांचे नविन एफएल-३ परवानाचे व्हेरिफिकेशन करून अधीक्षक यांचेकडे तक्रारदार यांची फाईल पाठविण्याकरिता आलोसे रविन्द्र लक्ष्मण कोकरे पद निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग ई विभाग नागपूर यांनी तक्रारदार यांचेकडे ४ लाख रू. लाचेची मागणी करून आज १६ मे २०२४ तडजोडीअंती ३ लाख २५ हजार लाच रक्कम स्वतः स्विकारली.

नमुद आलोसे यांनी आपले लोकसेवक पदाचा दुरूपयोग करून स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता लाच रकमेची मागणी करून स्वतः स्विकारल्याने त्यांचे विरूध्द पोलीस स्टेशन सिताबर्डी, नागपूर शहर येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात येत असून उपरोक्त आलोसे यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे.

सदरची कारवाई राहुल माकणीकर, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर, संजय पुरंदरे, अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रविण लाकडे, नापोशि सारंग बालपांडे, मपोहवा अस्मिता मेश्राम, पोहवा विकास सायरे, चालक नापोशि राजेंन्द्र जांभुळकर यांनी केलेली आहे.

Latest Posts

Don't Miss