Latest Posts

विद्यार्थी आपल्या योग्यतेनुसार परीक्षा देऊ शकणार : CBSE निर्णय घेण्याच्या तयारीत

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई (Mumbai) : गणित, विज्ञान, सामान्य विज्ञान हे विषय अनेक विद्यार्थ्यांना कठीण जातात. या विषयांना घाबरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असते. या विषयाची प्रश्नपत्रिका सोडवताना तुम्हाला काठीण्य पातळीनुसार कमी कठीण किंवा कठीण असा पर्याय देण्यात आला तर? विद्यार्थ्यांची शिक्षणाची गोडी टिकून राहावी यासाठी शैक्षणिक बोर्ड विविध योजना राबवत असते. सीबीएसई बोर्ड नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी असाच महत्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गणिताच्या (स्टॅण्डर्ड आणि बेसिक) २ लेव्हल सादर केल्यानंतर केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाने (सीबीएसई) २०२६-२०२७ शैक्षणिक वर्षापासून नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निर्णय घेतलाय. त्यानुसार या विद्यार्थ्यांना विज्ञान आणि सामान्य विज्ञान (स्टॅंडर्ड आणि एडव्हान्स) साठी एकसारख्या स्ट्रक्चरमध्ये काम केले जात आहे.

हे विषय २ पातळीवर सादर करण्याचा निर्णय सीबीएसईच्या करिक्युलम समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला. आता सर्वोच्च निर्णय घेणाऱ्या बोर्डाच्या बैठकीत यावर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

एडव्हान्स लेव्हलचा पर्याय निवडणारे विद्यार्थी वेगळ्या स्टडी मटेरियलचा वापर करणार की फक्त वेगळी परीक्षा देणार? याची रुपरेखा अंतिम होणे बाकी आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीएसई बोर्ड आता एनसीआरटीकडून नवी पुस्तके जारी केली जाण्याची वाट पाहत आहे. ही नवी अपडेट नॅशनल करिक्लुलम फ्रेमवर्कनुसार आहे.

शालेय शिक्षण आणि क्लासरुम करिकुलमवर केंद्राला सल्ला देणाऱ्या एनसीईआरटीने गेल्यावर्षी पहिली आणि दुसरीसाठी नवी पुस्तके जारी केली होती. यावर्षी तिसरी आणि सहावी इयत्तेसाठी नवी पुस्तके जारी केली. नवे शैक्षणिक वर्ष सुरु होण्याआधी २०२५ च्या सुरुवातीला आणखी काही इयत्तांसाठी पुस्तके जारी केली जाण्याची शक्यता आहे.

या निर्णय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत आहे. ज्यामध्ये स्पष्ट करण्यात आले की, गणिताने सुरु होणारे सर्व विषय आणि संबंधित मूल्यांकन दोन पातळीवर सादर केले जाऊ शकतात. ज्यामध्ये काही विषय स्टॅण्डर्ड पातळीवर आणि उच्च पातळीवर असतील. विद्यार्थ्यांवर येणारा विषयाचा दबाव कमी करण्यासाठी आणि कोचिंग कल्चर कमी करण्यासाठी धोरणाद्वारे प्रयत्न केले जात आहे.

सध्या सीबीएसई बोर्डात दहावीमध्ये दोन पातळीवर एक विषय शिकवला जातो. या मॉडेलमध्ये गणित (स्टॅण्डर्ड) आणि गणित (बेसिक) निवडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम सारखा आहे. पण बोर्डाच्या परीक्षेतील प्रश्नपत्रिकेत आणि प्रश्नांची काठीण्य पातळीची लेव्हल वेगवेगळी असते. ही सिस्टिम २०१९-२० या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यात आली होती.

सीबीएसईच्या आकडेवारीनुसार, २०२३-२४ च्या परीक्षेत बेसिक लेव्हलसाठी ६ लाख ७९ हजार ५६० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. तर स्टॅण्डर्ड लेव्हलसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १५ लाख ८८ हजार ४१ इतकी आहे. म्हणजेच बेसिकपेक्षा स्टॅण्डर्डसाठी जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी केली.

Latest Posts

Don't Miss