Latest Posts

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकासोबत पालकांचे योगदान महत्त्वाचे : माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम

– राजे धर्मराव प्राथमिक तथा माध्यमिक आश्रम शाळा वेलगुर येथे पालक मेळावा मोठ्या उत्साहात साजरा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये भरपूर गुणवत्ता आहे, पण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकासोबत पालकांचे योगदान महत्त्वाचे आहे, असे मत यावेळी माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी वेलगुर येथील पालक मेळाव्यात अध्यक्षीय भाषणात बोलताना व्यक्त केले.

राजे धर्मराव प्राथमिक तथा माध्यमिक आश्रम शाळा वेलगुर येथे पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राजे धर्मराव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम हे होते. तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून कुमार अवधेशरावबाब आत्राम आणि सहउद्घाटक म्हणून सुहास वसावे एकात्मिक सहा. प्रकल्प अधिकारी (प्रशासन) अहेरी, सूर्यभान डोंगरे सहा. एकात्मिक अधिकारी (शिक्षण) अहेरी, तर प्रमुख अतिथी म्हणून ग्रा. उपसरपंच पवन आत्राम, माजी जि.प. सदस्य विजया विठ्ठलानी, प.स. सद्स्य गीता चालूरकर, शा.व्य. समिती अध्यक्ष मधुकर सडमेक, जेष्ठ नागरिक राजू उत्तरवार, ग्रा.प. सदस्य रोहित गलबले, निशा सडमेक हे उपस्थित होते.

यावेळी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. पालक मेळावा निमित्ताने रांगोळी स्पर्धा, कबड्डी व व्हॉलीबॉल स्पर्धा घेण्यात आल्या आणि तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नृत्याच सुदर व मनमोहक सादरीकरण केल.

कार्यक्रमाचे संचालन एस.एन. अलेवार तर प्रस्तावना एस.के. वाठोरे आणि आभार रोहित गलबले यांनी मानले. यावेळी पालकवर्ग, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि मोठ्या प्रमाणावर विद्यार्थीगण उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss