Latest Posts

विद्यार्थ्यांनी कौशल्याधिष्टीत ज्ञानार्जनावर लक्ष केंद्रित करावे : भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे

– गिलगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराचे आयोजन.
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत वात्सल्य चॅरीटेबल ट्रस्ट वडधा द्वारा संचालित बाबुराव पा. भोयर कला महाविद्यालय वडधा च्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराचे आयोजन गिलगाव येथे करण्यात आले.

या कार्यक्रमाचे उद्घाटक धर्मेंद्र मुनघाटे गोंडवाना सिनेट सदस्य, स्वरूप तारणे गोंडवाना सिनेट सदस्य, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. दुर्वेश भोयर, विशेष अतिथी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, विलास दशमुखे भाजपा जिल्हा सचिव, रामरतन गोहने, सचिन बंदेलवार, कृष्णा अर्जुनकार, अशोक कुळमेथे, राकेश गोडसेलवार हेमंत शिडाम, तोंडरे, वाडके, पुजीराम मेश्राम, रमेश आवारी, मेघनाथ फुलजले, मोरेश्वर शेरकी, दिवाकर कोठांगले स्थानिक नागरिक महिला व शाळेतील शिक्षक वृंद विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे विशेष अतिथी स्थानावरून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलले की, विद्यार्थी दशत जीवनाचा पाया घातला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या वयामध्ये मोबाईल, टीव्ही, दारू खरा व तंत्रज्ञानाच्या आहारी न जाता. संत तसेच छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, संत गाडगेबाबा, सावित्रीबाई फुल इत्यादी महात्म्याचे उपदेश आत्मसात करावे.

भारत देश जागतिक महासत्ता बनण्याच्या मार्गावर चालत असून या चौवीससाव्या शतकाची दिशा ही सर्वसमावेशकतेची आहे. या व्यापक विश्वात आपली पावले घट्ट रोवण्यासाठी कौशल्य विकसित करून कौशल्याधिष्टीत ज्ञानार्जनावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले.

आपल्या जीवनात आनंदी व्हायचा असेल तर आनंद बाहेर शोधू नका. अंत:करण शुद्ध ठेवा म्हणजे आनंद स्वरूप जीवनाचा आनंद घेता येईल. आयुष्यात अपयश, नैराश्य आले तरी हार न मानता चुकीच्या मार्गाने न जाता स्वतःवर विश्वास ठेवून यशाची किल्ली प्राप्त करावा.

सोबतच स्वतः मध्ये जिद्द, सहनशीलता, दुसऱ्या सोबत स्पर्धा न करता स्वतः सोबतच स्पर्धा करून स्वतःचा भविष्य घडवावा व संत महात्म्याचे उपदेश स्वतःच्या अंगी आत्मसात करावा. असा विचार व्यक्त जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी विद्यार्थ्यांना मौलाच उत्कृष्ट मार्गदर्शन केले.

राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिर कार्यक्रमाचे औचित्य साधून गिलगाव येथील नवीन अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी अंगणवाडी शिक्षिका, सेविका उपस्थित होत्या.

Latest Posts

Don't Miss