Latest Posts

उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय कुरखेडा पोलीसांनी केले अवैध गोवंश वाहतुक करणारे वाहन जप्त 

– ०२ ट्रक व २२ गोवंशीय जनावरांसह एकुण २१ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : गडचिरोली जिल्ह्रातील गोवंशीय जनावरांच्या कत्तलीसाठी अवैधरित्या वाहतुक करणायांवर पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. ०६ ऑक्टोबर २०२३ रोजी मौजा आंधळी रोडणे मालवाहु वाहनामध्ये गोवंश जनावरांची वाहतुक होत आहे.

अशा गोपणीय बातमीदारांकडुन मिळालेल्या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी, कुरखेडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा/बाबुराव पुडो, राकेश पालकृतीवार, नरेश अत्यल्गडे व मनोज राऊत असे पोस्टे कुरखेडा हद्दीतील आंधळी गावासमोर थांबले असता, थोड्या वेळात नमुद संशयित वाहन येत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना हात दाखवुन थांबविले असता, दुरुनच पोलीसांना पाहुन वाहन चालक वाहन सोडुन पळून गेले.

त्यानंतर मालवाहु वाहनाजवळ जावुन बघीतले असता, सदरचे मालवाहु वाहन हे एकुण ०२ मालवाहु ट्रक असल्याचे दिसुन आल्याने वाहनामध्ये काय आहे ? याबाबत तपासणी केली असता, दोन्ही वाहनांमध्ये गोवंश जनावरे अतीशय निर्दयतेने कोंबुन भरले असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर सदर मालवाहू ट्रक क्र. एम एच-४०-सी डी-१५४५ व एम एच-३४ -ए बी-९००१ या दोन्ही वाहनामध्ये एकुण २२ गोवंश अंदाजे किंमत प्रत्येकी ७ हजार रुपये प्रमाणे एकुण किंमत १ लाख ५४ हजार रुपये व दोन मालवाहू ट्रक अंदाजे किंमत प्रत्येकी १० लाख रुपये प्रमाणे एकुण २० लाख असा एकुण २१ लाख ५४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन त्यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन, कुरखेडा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा साहिल झरकर यांचे मार्गदर्शनात करण्यात आली.

Latest Posts

Don't Miss