– माजी जिल्हापरिषद अध्यक्ष भाग्यश्री हलगेकर (आत्राम) यांनी राष्ट्रवादीचा दुपट्टा टाकून केल्या पक्षात स्वागत
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिरोंचा (Sironcha) : सिरोंचा तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणजे कोर्ला येथील भारतराष्ट्र समिती (BRS) माजी आमदार दिपक आत्राम यांचे सुशीला गणपत वेलादी सरपंचसह ग्रामपंचायत सदस्यांनी आविसला राम राम करित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हापरिषद अध्यक्षा भाग्यश्री हलगेकर (आत्राम) यांच्या नेतृत्वावर आणि त्यांच्या कामावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केल्या.
सदर पक्षप्रवेश भाग्यश्री हलगेकर (आत्राम) हे सिरोंचा तालुका दौऱ्यावर असतांना ग्रामपंचायत कोर्ला येथे सरपंचसह ग्रा.प. सदस्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दुप्पटा टाकून केल्या पक्षात स्वागत.
कोर्ला ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि सर्व सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश केल्याने जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणूका इतर राजकीय पक्षांना नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच (BRS) चे सक्रिय कार्यकर्ते राष्ट्रवादीत पक्षात आल्याने पक्षाला एक ताकद मिळाली आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सिरोंचा तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लूरी, सिरोंचा पंचायत समितीचे माजी सदस्य जपंय्या दुर्गम, ग्रामपंचायत कोर्ला सदस्य नारायण तलांडी, प्रतिष्ठित नागरिक सुरेश कोडापे, सुरेश सडमेक प्रतिष्ठित नागरिक, कट्टर बाबासमर्थक बिरा आत्राम, राष्ट्रवादी व सामाजिक कार्यकर्ते रवी सुलतान, सामाजिक कार्यकर्ते गावडे वेंकटी, रा. समर्थक नरेश कडार्ला आदी उपस्थित होते.