Latest Posts

ताडोबाचा वाघ ओडिशा राज्यात : तब्बल २ हजार किलोमीटरचा अंतर पार 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : ताडोबा अभयारण्यात वाघांचे वास्तव्य आहे हे सर्वांनाच माहिती आहे. ब्रम्हपुरी वन विभाग ला लागूनच असणाऱ्या ताडोबाच्या अभयारण्यातील एका नर वाघाने तब्बल दोन हजार किलोमीटरचं अंतर पार करत ओडिशा गाठले आहे.

यावेळी या वाघाने जवळपास चार राज्याचे जंगलं देखील पार केली आहेत. ओडिशामधील जंगलामध्ये हा वाघ दिसला असल्याची माहिती एका वन अधिकाऱ्याकडून देण्यात आली होती. यानंतर हा तडोबातील वाघ तिकडे गेल्याची माहिती समोर आली.

देशभरात मोजकेच वाघ शिल्लक आहेत. अशा वेळी वाघांच्या गळ्यात रेडिओ कॉलर लावला जातो. यामुळे वाघांचं ठिकाणं वन विभागाच्या अधिकाऱ्यांना शोधणं सोपं होतं. मात्र ब्रम्हपुरीमधील या वाघाच्या गळ्यामध्ये रेडिओ कॉलर नाही. ओडिशातील अधिकाऱ्याला हा वाघ दिसल्यानंतर त्याने गुरुवारी याविषयी माहिती दिली होती. यानंतर वाघाचं मूळ क्षेत्र कोणतं हे शोधण्यासाठी भारतीय वन्यजीव संस्थेला वाघाची माहिती आणि फोटो पाठवण्यात आले होते. यानंतर हा वाघ महाराष्ट्रातील ताडोबातील असल्याचे लक्षात आले. सुरक्षित प्रदेश आणि जोडीदाराच्या शोधात या वाघाने एवढे मोठे अंतर पार केले असावे असा अंदाज वर्तवला जात आहे. या वाघाची ओळख त्याच्या अंगावर असलेल्या पट्ट्यांवरुन करण्यात आली. प्रत्येक क्षेत्रातील वाघांना विशिष्ट प्रकारचे पट्टे असतात. यामुळेच पट्ट्यांवरुन हा वाघ ताडोबातील असल्याचे समोर आले.

या वाघाने आपल्या दोन हजार किलोमीटरच्या प्रवासामध्ये चार जंगले पार केली आहेत. या दरम्यान त्याने अनेक नदी, नाले, शेतं, रस्ते आणि मानवी वस्त्या देखील पार केल्या आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एवढे मोठे आंतर पार करुनही वाघाचा मानवांसोबत सामना झालेला नाही. सहसा ओडिशाच्या जंगलामध्ये छत्तीसगडमधील वाघ नेहमीच येत असतात. मात्र विदर्भातील वाघ हा ओडिशामध्ये जाण्याची पहिलीच वेळ आहे.

यापूर्वीही एका वाघाने पार केला होता तीन हजार किमीचा अंतर  : 
यापूर्वी देखील एका वागाने तब्बल तीन हजार किलोमीटरचा प्रवास केला होता. त्यावेळी यवतमाळमधील टिपेश्वर जिल्ह्यातील कॉलर आयडी असलेला वाघ हा तेलंगणात गेला होता. मात्र तेथून तो परत महाराष्ट्रातही आला होता. या वाघाने तब्बल तीन हजार किलोमीटरचा प्रवास केला होता. अखेरीला हा वाघ बुलढाणा जिल्ह्यमधील ज्ञानगंगा अभयारण्यात आला होता. दरम्यान महाराष्ट्रातील वाघांची संख्या ही सध्या ४४४ आहे. ओडिशामध्ये २० वाघ आहेत.

Latest Posts

Don't Miss