Latest Posts

तलाठी, कोतवाल, अव्वल कारकून ही नामे आता इतिहासजमा : राज्य सरकारचा मोठा निर्णय

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / पुणे (Pune) : महसूल विभागातील ग्रामस्तरावर महत्त्वाची जबाबदारी सांभाळणारे तलाठी, कोतवाल व अव्वल कारकून यांच्या पदनामामध्ये राज्य शासनाकडून बदल करण्यात आला आहे. तलाठ्यांना यापुढे ग्राम महसूल अधिकारी म्हणून ओळखण्यात येणार आहे तर कोतवालांना आता महसूल सेवक म्हणून संबोधण्यात येईल.

शासकीय कार्यालयांमधील अव्वल कारकून यांच्याही पदनामात बदल करण्यात आले असून आता त्यांना सहाय्यक महसूल अधिकारी म्हणून ओळखले जाणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने निर्णयांची सरबत्ती लावली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या सोमवारच्या बैठकीनंतर महसूल विभागाने पदनामातील बदलांचे तीन शासन निर्णय जारी करण्यात आले. त्यानुसार तलाठी, कोतवाल व अव्वल कारकून यांच्या पदनामातील हे बदल सुचवण्यात आले आहेत. गावपातळीवर तलाठी आणि कोतवाल ही नावे प्रचलित आहेत. सर्वांना परिचित असलेल्या या पदांच्या नामात बदल झाल्याने त्यांची ओळख बदलण्याचा प्रयत्न राज्य सरकारने या माध्यमातून केला आहे.

७२५ तलाठी, ५३४ कोतवाल –
जिल्ह्यात महसुली गावांची संख्या एक हजार ९३१ इतकी असून, त्यासाठी ७२५ तलाठी नियुक्त करण्यात आले आहे. यात १८२ तलाठ्यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. ९६ तलाठी सर्वसाधारण व ८६ तलाठ्यांना पेसांतर्गत ४१ हजार ८९५ रुपये मानधनावर नियुक्ती देण्यात आली. तसेच जिल्ह्यात ५३४ कोतवाल आहेत.

Latest Posts

Don't Miss