Latest Posts

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी संपन्न

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / बल्लारपूर (ballarpur) : ५१ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन सेंटपॉल स्कूल बामणी बल्लारपूर येथे ३० नोव्हेंबर १ व २ डिसेंबर २०२३ या कालावधीत संपन्न झाले.

प्रदर्शनीत एकूण प्राथमिक व माध्यमिक च्या ६४ शाळांनी भाग घेतला. त्यात प्राथमिक वर्ग गट ६ ते ८ मध्ये प्रथम क्रमांक कु. रागिनी रॉय वियाणी ज्युबिली हाय. बल्लारपूर, द्वितीय क्रमांक हार्दिक वाकेकर दिलासा ग्राम कॉन्व्हेंट सीबीएसई बल्लारपूर, तृतीय क्रमांक कु. तपस्या पाटणकर जि.प. हायस्कूल विसापूर यांच्या प्रतिकृतीची निवड झाली. तर माध्यमिक वर्ग ९ ते १२ मध्ये प्रथम क्रमांक कु. दिव्यांशी गुड्डरू जनता विद्यालय सिटी ब्रँच बल्लारपूर, द्वितीय क्रमांक अवंती धोंगडे नगर परिषद गांधी विद्यालय बल्लारपूर, तृतीय क्रमांक सिद्धार्थ राच्चावार सन्मित्र सैनिकी विद्यालय भिवकुंड , अदिवासी गटातून वर्ग ६ ते ८ मध्ये प्रथम क्रमांक वीर राकेश येल्लोरे जि.प.उ.प्रा. शाळा कवडजई, आदिवासी गट वर्ग ९ ते १२ मध्ये प्रथम क्रमांक करण शेट्टी, शांती निकेतन विद्यालय मानोरा यांच्या प्रतिकृतीची निवड करण्यात आले.

वक्तृत्व स्पर्धा प्राथ. गट वर्ग ६ ते ८ मध्ये प्रथम क्रमांक रागिनी रॉय वियाणी ज्युबिली हाय. बल्लारपूर, द्वितीय क्रमांक नयन मोरे साईबाबा ज्ञानपीठ कॉन्व्हेंट बल्लारपूर, तृतीय क्रमांक श्रीहर्षिणी येनामंद्रा दिलासा ग्राम कॉन्व्हेंट सीबीएसई बल्लारपूर, माध्यमिक गट वर्ग ९ ते १२ मध्ये प्रथम क्रमांक सोहम शेरकी सेंटपॉल कॉन्व्हेंट बल्लारपूर, द्वितीय क्रमांक कनक दीक्षित गुरुनानक पब्लिक स्कूल बल्लारपूर, तृतीय क्रमांक सिद्धार्थ रचावार सन्मित्र सैनिकी विद्यालय भिवकुंड यांनी प्राप्त केले.

शिक्षक प्राथमिक गट मध्ये प्रथम क्रमांक कलावती वानखेडे शिक्षिका जि.प.प्रा. शाळा विसापूर टेकडी, शिक्षक माध्यमिक गट प्रथम क्रमांक सुरेखा मिश्रा पांडे शिक्षिका वैभव कॉन्व्हेन्ट बल्लारपूर, परिचर गट प्रथम क्रमांक सृजना मॅडम, दिलासाग्राम कॉन्व्हेंट सीबीएसई बल्लारपूर यांना मिळाला.

विज्ञान प्रदर्शनात परिक्षक म्हणून तबस्सम अन्सारी शिक्षिका गुरुनानक पब्लिक स्कुल बल्लारपूर, प्रिती मंदावार शिक्षिका माऊंट इंग्लिश ज्युनिअर कॉलेज बल्लारपूर, घुंगरूडकर शिक्षक बालाजी हायस्कुल बामणी, अमित कुमार शिक्षक गुरुनानक पब्लिक, स्कुल बल्लारपूर, प्रा. दोरनलवार थापर जुनियर कॉलेज बल्लारपूर, प्रा. खिराडे गुरुनानक सायन्स ज्युनियर कॉलेज बल्लारपूर यांनी केले. सर्व परीक्षकांनी प्रतिकृतीचे मुल्यमापन करून प्रत्येक गटातून उत्कृष्ट प्रतिकृतीची निवड केली.

बक्षिस वितरण समारंभ कार्यक्रम शरद बोरीकर गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती बल्लारपूर यांच्या अध्यक्षतेखाली अविनाश खैरे संस्थापक सेंटपॉल स्कूल तथा सेंटपॉल नर्सिंग कॉलेज बामणी बल्लारपूर यांचे हस्ते झाले. प्रमुख अतिथी निना खैरे संचालक सेंटपॉल स्कूल, बामणी, रविंद्र लामगे शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती बल्लारपूर, नागेंद्र कुमरे केंद्रप्रमुख केंद्र विसापूर, कावडकर मुख्याध्यापिका सन्मित्र सैनिक स्कूल भिवकुंड, मेनका भंडुला मुख्याध्यापिका सेंटपॉल स्कूल बामणी होते.

निवड झालेल्या सर्व स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन स्वागत व अभिनंदन करण्यात आले. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणात पत्र देण्यात आले. रवींद्र लामगे शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती, बल्लारपूर यांनी तीन दिवशीय विज्ञान प्रदर्शनी कार्यक्रमाचे अहवाल वाचन केले व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच प्रा. दोरनलवार थापर जुनियर कॉलेज बल्लारपूर तथा तबस्सम अन्सारी शिक्षिका गुरुनानक ज्युनिअर कॉलेज बल्लारपूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले व विद्यार्थ्यांना शुभेच्छा व मार्गदर्शन केले. शरद बोरीकर गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती बल्लारपूर विद्यार्थ्यांना विज्ञानाचे महत्त्व समजून सांगितले सर्वांना शुभेच्छा दिल्या यश अपयश कडे लक्ष न देता सतत प्रयत्न करावे. तसेच जनता सिटी विद्यालय ची दिव्यांशी गुडुरु हिने एक हिंदी मध्ये सर्वांना प्रेरणादायी स्वरचित कविता ऐकविली.

Latest Posts

Don't Miss