Latest Posts

तेली समाजाने एकत्रित येण्याची आवश्यकता : इंजि. प्रमोद पिपरे

– वैरागड येथे संत जगनाडे महाराज पुण्यतिथी व तेली समाज मेळाव्याचे आयोज
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : तेली समाज हा महाराष्ट्रात प्रामुख्याने गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे. समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय तसेच सर्वांगीण विकासासाठी तेली समाजाने एकत्रित येण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पिपरे यांनी केले.

तेली समाज वैरागड च्या वतीने संत जगनाडे महाराज पुण्यतिथी व तेली समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रमोद पिपरे बोलत होते.

या मेळाव्याचे उद्घाटन महाराष्ट्र प्रांतिक दैनिक महासंघाचे उपाध्यक्ष बबनराव फंड यांनी केले. यावेळी किसनराव खोब्रागडे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाग्यवान खोब्रागडे, प्रभाकर वासेकर, बाबुराव कोहळे, माजी प्राचार्य पी.आर. आकरे, उमेशचंद्र चीलबुले, तुळशीराम चिलबुले, विस्तार अधिकारी जवनजाळकर, परसराम टिकले, मिलिंद खोब्रागडे, फाल्गुन मेहेरे, दत्तात्रय क्षीरसागर, सरपंच संगीता पेंदाम, आत्माराम भानारकर, माजी सरपंच लीला मुंडले, बुद्धाजी किरणे, पुंडलिक देशमुख, रामदास जंजाळकर, शेषराव पिंपळे, संगीता मेश्राम, मनीषा खरवडे, महादेव दुमाने, सुभाष बरडे, रामदास डोंगरवार, सत्यदास आत्राम, दिलीप फुलबांधे, विजय गुरनुले, गोपाल भांडेकर, डोनूजी कांबळे, प्रलय सहारे प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रास्ताविक उपसरपंच भास्कर बोडने यांनी केले तर यशस्वीतेसाठी रमेश लांजेवार, संदीप ठेंगरे, सुखदेव बोडणे, सुरेश बावनकर, रमेश ओक, अमोल लांजेवार, पांडुरंग आकरे, चंदू बावनकर, वंदना बोडणे, रंजना ठेंगरे, दुर्गा बोधनकर, संगीता आकरे, ज्योती मेहरे, अलका बावनकर, लता आकरे, पूजा लांजेवार, उषा क्षीरसागर, शुभांगी बावनकर व समाज बांधवांनी सहकार्य केले.

कार्यक्रमादरम्यान गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवुन सत्कार करण्यात आला. तत्पुर्वी सकाळी गावाच्या मुख्य रस्त्याने संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली.

Latest Posts

Don't Miss