Latest Posts

त्या नरभक्षी वाघाला जेरबंद करा अन्यथा आंदोलन करू : माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : तालुक्यातील चिंतलपेठ येथील आज सकाळच्या सुमारास नरभक्षी वाघाने महिलेला ठार केल्याची घटना घडली आहे. सदर घटना दुखत असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर ठार झालेल्या महिलेचे नाव सुषमा देविदास मंडल असे आहे. सदर घटनेची माहिती मिळताच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांना परिवारातील व्यक्तींना घटनेबाबत विचारणा केले. मृतक कुटुंबियांना वनविभागातर्फे आर्थिक मदत करावे, अशा सूचनाही दिल्या आहे.

मागील काही महिन्यांपासून गडचिरोल्ली जिल्ह्यांतील आरमोरी व गडचिरोल्ली तालुक्यात वाघाचा धुमाकूळ सूरु आहे. या वाघांनी अनेकांचे बडी घेतलेले आहेत. अशातच अहेरी तालुक्यात ही घटना घडली. सद्यस्तिथीत परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता सध्या कापूस काढणीचे काम परिसरात सुरू आहे. या घटनेमुळे सकाळी सुद्धा फिरणे अवघड झाले आहे.

त्या नरभक्षी वाघाला त्वरित जेरबंद करण्यात यावी. जर त्वरित या वाघाला जेरबंद न केल्यास नागरिकांना घेऊन वनविभाग कार्यालय समोर आंदोलन करण्याचा इशारा आविसं- काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी दिला आहे.

Latest Posts

Don't Miss