Latest Posts

माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या उपस्थितीत श्रीरामाच्या जयघोषाने दुमदुमले राजनगरी अहेरी

– न भूतो न भविष्यती मंगल कलश यात्रेत हजारो रामभक्तांची उपस्थिती
– राममय झाले वृंदावन धाम, शहरातील रामभक्तांनी घेतले LED स्क्रीनवर अयोध्येतून थेट दर्शन 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : अहेरी येथील वृंदावन धाम येथे अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा वतीने २२ जानेवारी रोजी श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण जनतेला दिसावे ह्यासाठी भव्य LED स्क्रीन व भव्य पंडाल राम भक्तांकरिता लावण्यात आले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग सहप्रचारक सागरजी अहेर सह अनेकांची उपस्थिती होती. तत्पूर्वी अहेरी शहरात सकाळी ९ वाजेपासून भव्य मंगल कलशयात्रा मुख्य मार्गातून काढण्यात आले. कलशयात्रेत विविध समाजातील हजारोंच्या संख्येने सनातन हिंदू म्हणून एकत्र येऊन या ऐतिहासिक क्षणाचे साक्षी झाले, श्री. विठ्ठल रखुमाई मंदिरापासून कलश यात्रेला सुरुवात झाली आणि शहरात फिरून वृंदावन धाम येथे कलश यात्रा पोहचली. कलश यात्रेत शहर व परिसरातील महिला, पुरुष, मुले, मुली असे तब्बल १० हजाराच्या संख्येने सहभागी झाले होते, ही कलश यात्रा न भूतो न भविष्यती असेच होती.

वृंदावन धाम येथे अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठा शुभमुहूर्तावर राजे अंब्रिशराव आत्राम यांनी भक्ती भावाने महाआरती केले. यावेळी राम भक्तांनी एकच जल्लोष केला, सुमारे ५०० वर्षांनंतर प्रभू रामलला सोमवारी अभिजित मुहूर्तावर भव्य दिव्य मंदिरात विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामललाच्या बाल स्वरूपातील मूर्तीची मंत्रोच्चाराच्या निनादात विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी मंदिरातील गर्भगृहात पंतप्रधान मोदीच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आले.

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासोबतच पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ११ दिवसांच्या अनुष्ठानाचीही सांगता केली. प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू असताना लष्करी हेलिकॉप्टर मधून राम मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात येत होती. गोल्डन कुर्ता आणि धोतर असा खास पेहराव पंतप्रधानांनी केला होता. हातात मंगल कलश घेऊन त्यांनी मंदिरात प्रवेश केला.

आजच्या ऐतिहासिक सोहळ्यासाठी राजनगरी अहेरी मोठ्या दिमाखात सजले होते. संध्याकाळी जागोजागी दीपोत्सव साजरा करण्यात आले. सर्वत्र दिवाळी सारखेच वातावरण होते. संपूर्ण शहरात राममय वातावरण दिसत होते. ठीक – ठिकाणी कलश यात्रे दरम्यान पाणी, ज्यूस, फलहारी, फळे आदी वाटण्यात आले.

Latest Posts

Don't Miss