– वनविभागात उडाली खळबळ
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / सिंदेवाही (Sindewahi) : सिंदेवाही तालुक्यातील शेत परिसरात उड़ीसा वरून दाखल झालेला नर हत्तीचा मृत्यू तांबेगडी मेंढा उपवनक्षेञातील मुरपार बिटात चिटकी जंगल परिसरात झाल्याने सिंदेवाही तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे
प्राप्त माहिती नुसार सिंदेवाही तालुक्यातील गावात हत्तीने शेतशिवारात थैमान घातले होते. यात कच्चेपार येथील जंगलालगतच्या शेतीमधील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. हत्तीच्या आगमनामुळे शेतकऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे शेतकरी चांगलेच धास्तावले आहे. या हत्तीने सिंदेवाही परिसरात शेतीचे नुकसान झाले होते.
त्यानंतर अचानक हतीचा मृत्यू झाल्याचे वनविभागात एकच खळबळ उडाली.
सदर घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी जागेवर दाखल झाले असून पुढील तपास करीत आहेत.