Latest Posts

पतीचा गळा दाबून पत्नीने केला खून : ईसापुर (इटखेडा) येथील घटना 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया (Gondia) : पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ईसापुर (इटखेडा) येथील मेघशाम कुंडलिक भावे (४२) याचा त्याची पत्नी वैशाली मेघशाम भावे (३८) हिने ११ जूनला रात्री १० वाजता जेवण आटपून पती-पत्नी झोपी गेले. पती झोपेत असताना त्याची पत्नी वैशाली व तिच्या बहिणीची मुलगी या दोघांनी मिळून मेघशाम याचा गळा दाबून जीव घेतला.

माहितीनुसार, बुधवार १२ जून रोजी सकाळी ७ वाजता दूध काढण्यासाठी वडिलांनी मुलाच्या पायाला स्पर्श करून उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलाचा शरीर त्याच्या हाताला थंड लागल्याने मुलगा मरण पावल्याचे निदर्शनास आले. मुलाचा आकस्मित मृत्यू झाला समजून त्याची अंत्यविधी करिता तयारी करण्यात आली. संपूर्ण नातेवाईक आल्यानंतर दुपारी १ वाजता अंत्यविधी करिता त्यांची आंघोळ करण्यात आली. त्यावेळी त्यांच्या गळ्यावरती गळफासची खून दिसून आली. आई, वडील व नातेवाईकांच्या लक्षात आले की, मेघशामचा खून करण्यात आला. याची दखल घेऊन अर्जुनी मोर येथे त्याचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता आणले व अर्जुनी मोर पोलिस ठाणे येथे तक्रार नोंद करण्यात आली. तपासात युवकाचा मृत्यू नसून खून असल्याचे लक्षात येतात ठाणेदार विजयानंद पाटील, बीट अंमलदार डोंगरवार, सहकारी यांच्यासह वैशाली भावे व तिची बहिणीची मुलगी यांना पोलिस ठाण्यात आणले. त्यांची जबान बोलती करण्यात आली.

सदर प्रकरणात अनेक मासे अडकण्याची शक्यता आहे.

Latest Posts

Don't Miss