Latest Posts

निरपराध इसमाच्या खुनात सक्रिय सहभाग असलेल्या दोन जहाल माओवाद्यांस गडचिरोली पोलीस दलाने केले अटक

– महाराष्ट्र शासनाने जाहीर केले होते एकुण १० लाख रुपयांचे बक्षीस

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : गडचिरोली जिल्हा हा माओवादग्रस्त जिल्हा म्हणून ओळाल्या जातो. येथे माओवादी हे सरकारी मालमत्तेचे नुकासान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात. तसेच माओवाद्यांच्या येणाऱ्या नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलाविरुद्धच्या अनेक हिंसक कार्यवायांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या दोन माओवाद्यांस आज ०१ मे २०२४ रोजी गडचिरोली पोलीस दलाने अटक केले. गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभाची कारवाईमुळे माहे जानेवारी २०५२ ते आतापर्यंत एकूण ८१ माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीम क्लास यश आलेले आहे.

उपविभाग भामरागड अंतर्गत पोस्टे धोहराज हद्दीतील जंगल परिसरामध्ये विशेष अभियान पथक प्राणहिताचे जवान माओवादविरोधी अभियान राबवित असतांना त्यांना दोन संशयित व्यक्ती पोस्टे धोडराज हद्दीत घातपात करण्याच्या उद्देशाने फिरत असतांना आढळून आल्याने विशेष अभियान पथकाच्या जवानांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची अधिक सखोल चौकशी केली असता, त्यांची नावे १) रवि मुरा पल्ली (ॲक्शन टिम कमांडर), (३३), रा. कवंडे, तह. भामरागड, जि. गडचिरोली, २) दोबा कोरके बड़े (पार्टी सदस्य, भामरागड दलम), (३१) रा. कवंडे, तह. भामरागड, जि. गडचिरोली अशी असून, या दोघांचा माई नोव्हेंबर २०२३ मध्ये मौजा पेनगुंडा येथे झालेल्या दिनेश गावडे या निरपराध इसमाच्या हत्येमध्ये त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना पोस्टे धोडराज येथे त्या अनुषंगाने दाखल अप क. ०२/२०२३ कलम ३०२, १४३, १४७, १४८, १४९, १९० (ब) भादवी सह कलम ३/२५ भाहका अन्यये गुन्ह्यात अटक करण्यात आली.

अटक माओवादी आरोपींची माहिती –
१) रवि मुरा पल्लो
– दलममधील कार्यकाळ
सन २०१६ पासून जनमिलिशीया पदावर भरती होऊन माओवाद्यांची कामे करित होता.
मन २०१८ पासून ॲक्शन टिम सदस्य म्हणून काम करीत होता.
सन २०२२ मध्ये ॲक्शन टिम कमांडर म्हणून बढती व आरपावेतो कार्यरत

– कार्यकाळात केलेले गुन्हे
त्याचवर आजपर्यंत एकुण ०६ गुन्हे दाखल असून त्यामध्ये ०१ चकमक, ०१ जाळपोळ, ०३ खून व ०१ ब्लास्टींग वा गुन्ह्यांचा समावेश आहे.

– चकमक ०२
सन २०१९ मध्ये मौजा मारोमेट्टा जंगल परिसरात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीमध्ये त्याचा सहभाग होता. या चकमकीत १२ माओवाद्यांना ठार करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले होते.

– जाळपोळ ०१
सन २०२२ मध्य मौजा धोडराज ते हरपनार मार्गावरील पेनगुंडाजवळ रस्ता बांधकाम करण्याच्या हेतूने कामावरील ट्रॅक्टर, ग्रेडर व जेसीबी सारख्या १९ वाहनांची जाळपोळ करण्यात त्याचा सहभाग होता.

– खून ०३
माहे नोव्हेंबर २०१८ मध्ये मौजा इरपनार येथील निरपराध महिला बेबी मडावी हिच्या हत्यमध्ये प्रत्यक्ष सहभाग.
सन २०२२ मध्ये मौजा नेलगुंडा येथील निरपराध इसम राजेश आत्राम याचे हत्येमध्ये प्रत्यक्ष सहभाग.
माहे नोहेंबर २०२३ मध्ये मौजा पेनगुंडा येथे झालेल्या निरपराध इसम दिनेश गावडे याचे हत्येमध्ये प्रत्यक्ष सहभाग.

– इतर ०१
२२ मार्च २०२३ गोजी मेलगुंडा जंगल परिसरात जमिनिट स्फोटक पुरुन ठेवण्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.

– दोबा कोरके वड्डे
– दलममधील कार्यकाळ
सन २००८ पासून जनमिलिशिया पदावर भरती होऊन माओवाद्याचे काम केले.
सन २०१९ मध्ये भामरागड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन आजपावेतो कार्यरात

– कार्यकाळात केलेले गुन्हे
त्याचेवर आजपर्यंत एकुण १८ गुन्हे दाखल असून त्यामध्ये ०५ चकमक, ०७ खून व इतर ०६ गुन्ह्यांचा समावेश आहे.

– कार्यकाळात केलेले गुन्हे
– चकमक 
सन २०१९ मध्ये मौजा मोरोमेट्टा जंगल परिसरात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीमध्ये त्याचा सहभाग होता. या चकमकीत ०२ माओवाद्यांना ठार करण्यात गडचिरोली पोलीस दलात यश आले होते.

– जाळपोळ 
सन २०१२ मध्ये मौजा धोडराज इरपणार मार्गावरील पेनगुंडाजवळ रस्ता बांधकाम बंद करण्याच्या हेतूने कामावरील ट्रॅक्टर, ग्रेडर व जेसीबी सारख्या १९ वाहनांची जाळपोळ करण्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.

– खून 
सन २०२२ मध्ये मौजा नेलगुंडा येथील निरपराध राजेश आधाम पाचे हत्येमध्ये प्रत्यक्ष सहभाग.
माहे नोव्हेंबर २०२३ मध्ये मौजा पेंनगुंडा येथे झालेल्या निरपराध  इसम दिनेश गावडे याचे हत्येमध्ये प्रत्यक्ष सहभाग.

– शासनाने जाहिर केलेले बक्षीस. 
१) महाराष्ट्र शासनाने रवि मुरा पल्लो याच्या अटकेवर ०८ लाख रुपयाचे बक्षीस ताहिर केले होते.
२) महाराष्ट्र शासनाने दोबा कोरके वट्टे याच्या अटकेवर ०२ लाख रुपयाचे बक्षीरा जाहिर केले होते.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिता, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी एम. रमेश तसेच पोलीस उप- अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे यांचे मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक, प्राणहिताच्या जवानांनी पार पाडली. तसेच पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी माओवाद्यांना माओवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन उगण्याचे आवाहन केली आहे.

Latest Posts

Don't Miss