Latest Posts

आईची हत्या करून मुलाने पुरला घरात मृतदेह : गादी टाकून त्यावर करायचा पार्टी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / भोपाळ (Bhopal) : एक धक्कादायक आणि हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. यात एका मुलाने आपल्या वृद्ध आईची हत्या करून तिला घरातच पुरले. यानंतर, वर एक गादी ठेवली आणि तो त्याच गादीवर बसून तीन दिवस त्याच्या मित्रांसोबत मद्यपान तसंच पार्टी करत राहिला.

या घटनेत आरोपी मुलासोबत त्याचा मित्रही सहभागी होता. मात्र, घटनेच्या पाच दिवसांनंतर पोलिसांना याची माहिती मिळाली. त्यांनी आरोपी मुलाला आणि त्याच्या मित्राला अटक करून वृद्ध महिलेचा मृतदेह बाहेर काढला. ही घटना मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील भानपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे.

माहितीनुसार, कन्हैयालाल धोबी (३५) रा. कचरी चौक हा त्याचा मित्र बसंतीलाल धोबी (५०) याच्यासोबत १२ जून रोजी भानपुरा येथील बडा महादेव रोड येथे दिवसभर दारू पार्टी करत होता. रात्री १० वाजता तो मित्रासोबत दारूच्या नशेत घरी पोहोचला. आरोपीने आईला पटकन जेवण वाढवण्यास सांगितले. आपल्या मुलाला नशेत पाहून आई गंगाबाई रागावल्या. त्यांनी रागाच्या भरात मुलाच्या गालावर चापट मारली. आईने मुलाला चापट मारताच तो चिडला आणि त्याने मित्रासह मिळून आईला मारहाण करण्यास सुरुवात केली.

त्याने गंगाबाईला धक्का दिला तेव्हा तिचे डोके थेट पाण्याचे भांडे ठेवण्याच्या बारवर आदळले. त्यामुळे तिच्या डोक्यातून रक्त वाहू लागले आणि ती जमिनीवर पडली. बराच वेळ वेदनेने ओरडत राहिली. यानंतर आई मृत झाल्याचे समजून दोघांनी रात्री खड्डा खणून त्यात तिला पुरले, नंतर त्यावर माती टाकून त्यावर गादी ठेवली. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन केले. दोन्ही आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

आरोपीने मित्राच्या मदतीने घरातील सेप्टिक टँकसाठी खोदलेल्या खड्ड्यात आईचा मृतदेह पुरला आणि वरती वाळू टाकली. नंतर त्यावर गादी पसरवली. गंगाबाईच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर मित्र त्याच्या घरी गेला, तर मुलगा मृतदेहावरील गादीवर झोपला होता. तीन दिवसांनंतर दुर्गंधी येऊ लागल्यावर आरोपी मुलगा राजस्थानातील पगारिया गावात पळून गेला.

दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी मृताच्या जावयाला माहिती दिली. यानंतर पोलीसही घटनास्थळी पोहोचले. येथे गंगाबाई या ५८ वर्षीय महिलेचा मृतदेह घराच्या आतील खड्ड्यात पुरलेला आढळून आला. मृत गंगाबाई यांना अर्धांगवायू झाला होता, असे शेजाऱ्यांचे म्हणणे आहे. जावयाच्या माहितीवरून पोलिसांनी घरातील गादी काढून खड्डा खोदला असता, त्यात गंगाबाईचा मृतदेह पुरलेला आढळून आला.

Latest Posts

Don't Miss