Latest Posts

जगातील सर्वांत मोठ्या धान्य साठवण योजनेचा शुभारंभ

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली (Navi Delhi) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सहकार क्षेत्रातील जगातील सर्वांत मोठ्या धान्य साठवण योजनेचा शुभारंभ केला. ११ राज्यांतील प्राथमिक कृषी कर्ज सोसायट्यांच्या (पीएसी) ११ कोठारांचे उद्घाटन मोदी यांनी केले. या योजनेवर १.२५ लाख कोटी रुपये खर्च होणार आहेत.

याच कार्यक्रमात मोदी यांच्या हस्ते आणखी ५०० सोसायट्यांच्या कोठारांच्या उभारणीसाठी कोनशिला समारंभही पार पडला. १८ हजार सोसायट्यांच्या संगणकीकरणाचे उद्घाटनही त्यांनी केले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचेही याप्रसंगी भाषण झाले. आगामी सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी ३० हजार सोसायट्यांचे संगणकीकरण पूर्ण केले जाईल. ६५ हजार सोसायट्यांच्या संगणकीकरणास मंजुरी देण्यात आली असून त्यावर २ हजार ५०० कोटी रुपये खर्च होईल, असे अमित शाह यांनी सांगितले.

गुजरातमध्ये विकास प्रकल्पांचे करणार उद्घाटन –
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवार- रविवारी गुजरातेत आहेत. यावेळी ते देशभरातील ५२ हजार २५० कोटी रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन करणार आहेत. आरोग्य, रस्ते, रेल्वे, ऊर्जा आणि पर्यटन या क्षेत्रातील प्रकल्पांचा त्यामध्ये समावेश आहे.

राजकोट (गुजरात), भटिंडा (पंजाब), रायबरेली (उत्तर प्रदेश), कल्याणी (पश्चिम बंगाल) आणि मंगलगिरी (आंध्र प्रदेश) येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थांचे (एम्स) उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. राजकोटमधील एका कार्यक्रमात हा उद्घाटन समारंभ होईल.

Latest Posts

Don't Miss