Latest Posts

कार्यक्रमासाठी नातेवाईकाच्या घरी गेले अन्….खिडकीचे ग्रील तोडून २६ लाख रुपयांचा ऐवज चोरी  

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत सिंधी कॉलनी रामनगर येथे नातेवाईकाच्या गावाला कार्यक्रमाला गेलेल्या कुटुंबाच्या घरातील खिडकीचे ग्रील तोडून २६ लाखांचा ऐवज चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे.

खुशाल भागचंद अडवाणी सिंधी कॉलनी रामनगर चंद्रपूर यांनी १८ मार्च २०२४ रोजी रामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. ज्यामध्ये १५ मार्च रोजी दुपारी १.३० वाजता ते कुटुंबासह आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे नातेवाईकाच्या घरी गेले होते. १८ मार्च २०२४ रोजी सकाळी ८ वाजता घरी परतल्यानंतर वडिलांच्या बेडरूममध्ये बॅग ठेवण्यासाठी गेले असता बेडरूमच्या खिडकीचे ग्रील तुटलेले दिसले व कपाटात पाहिले असता २६ लाखांचा ऐवज चोरीला गेला होता.  तक्रारीच्या आधारे रामनगर पोलिस ठाण्यात अपराध क्रमांक ३००/२०२४ कलम ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.  घरफोडी झाल्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांचा मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस व गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाचा तपास केला असता आवारातील सीसीटीव्ही बघितले असता त्यांच्या घरी काम करणाऱ्या विकास महादेव गोंधळी रा. तोहगाव ता. गोंडपिपरी याने चोरी केलेचे उघडकीस आली.

त्यामुळे गोंधळी याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली असून विकासकडून २६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी विकास याला अटक करण्यात आली आहे.

वरील कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील गाडे पोलीस स्टेशन रामनगर, पोलीस निरीक्षक महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर सपोनि. हर्षल एकेरे, पोउपनि विनोद भुर्ले, रामनगर सपोनि देवाजी नरोटे, पोउपानी मधुकर समलवार, पोउपानी दीपेश ठाकरे, पोहवा पेत्रस सिडाम, पोहवा किशोर वैरागडे, पोहवा रजनीकांत पुठ्ठावार, पोहवा शरद कुडे, सतीश अवथारे, प्रशांत  शेंद्रे, नापोशी लालू यादव, पोशि हिरालाल.गुप्ता, पोशि रविकुमार ढेंगळे, पोशि प्रफुल्ल गारघाटे, पोशि संदीप कामडी, पोशि विकास जुमनाके, पोशि विकास जाधव, पोशि पंकज ठोंबरे, मापोहवा मनीषा मोरे पोलीस रामनगर येथे संयुक्त कारवाई करण्यात आली.

Latest Posts

Don't Miss