Latest Posts

तीन घरांना आगीचा वेढा : जीवितहानी टळली, संसार उघड्यावर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : पहाटे साखरझोपेत असतानाच तीन घरांना आगीने कवेत घेतले. शेजाऱ्यांनी आरडाओरड करुन कुटुंबांना जागे केले व ते सुखरुप बाहेर आली, त्यानंतर काही क्षणातच तिन्ही घरे जळून खाक झाली. सुदैवाने जीवितहानी टळली, पण या घटनेेने कुटुंबे उघड्यावर आली. ही घटना ३ मार्चला पहाटे अहेरी तालुक्यातील देवलमारीत घडली. आगीमागील कारण अस्पष्ट आहे.

अहेरीपासून १२ किलोमीटर अंतरावरील देवलमारी येथील मुत्तय्या मंचर्ला हे शेखर व संतोष या दोन मुलांसह राहतात. तिघांचीही स्वतंत्र घरे आहेत. २ मार्चला रात्री जेवण करुन सर्वजण आपापल्या घरी झोपी गेेले. पहाटे ३ वाजेच्या सुमारास घरांना आग लागली. आगीचे लोळ पाहून शेजाऱ्यांनी तिघांनाही जागे केले. त्यानंतर ते कुटुंबासह घराबाहेर पडले. या आगीत धान्य, कपडे, भांडी व इतर संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. आग एवढी भीषण होती की ती आटोक्यात आणण्याची संधीही मंचर्ला कुटुंबीयांना मिळाली नाही.

Latest Posts

Don't Miss