Latest Posts

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार : अहेरी तालुक्यातील चींतालपेठ येथील घटना 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : कापूस वेचणीकरिता शेतात गेलेल्या एका महिलेवर वाघाने हल्ला करून जागीच ठार केले. सदर घटना अहेरी तालुक्यातील चींतालपेठ येथे घडली.

माहितीनीनुसार, सुषमा देवदास मंडळ (५०) असे मृत्युक महिलेचा नाव असून आज रविवार ७ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास महिला कापूस वेचणी करित असतांना अचानक वाघाने हल्ला केला व हल्ल्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. सदर महिला मुलचेरा तालुक्यातील मथुरानगर येथील रहिवासी असून मागील १५- २० वर्षापासून चिंतालपेठ येथे स्थायी होती.

सदर घटनेची माहिती मिळताच अहेरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी आरती मडावी आपल्या चमूसह घटनास्थळी दाखल झाले. या आधी देखील अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्याकरिता लवकरात लवकर या वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी नागिकांकडून केली जात आहे.

Latest Posts

Don't Miss