Latest Posts

१७ नोव्हेंबरपर्यंत सामाजिक न्याय विभागातील शासकीय वसतिगृहात स्पॉट ॲडमिशन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाव्दारे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी चालविण्यात येणारी शासकीय वसतिगृहाची सन २०२३-२४ या शैक्षणिक सत्रासाठीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून पहिल्या व दुसऱ्या प्रवेश निवड यादी व्यतिरिक्त रिक्त जागेवर स्पॉट ॲडमिशन देण्याची तारीख १७ नोव्हेंबर ही निश्चित करण्यात आली आहे.

१७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता सहायक आयुक्त, सामाजिक न्याय भवन, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसमोर, श्रध्दानंद पेठ, नागपूर येथे आवश्यक कागदपत्रासह हजर व्हावे. विद्यार्थी निर्धारित तारखेस हजर न झाल्यास त्यांचा प्रवेश निश्चित केला जाणार नाही व त्याची सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थ्यांची राहील, असे जाहीर आवाहन सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, वसंतनगर, नागपूर या कार्यालयाशी संपर्क करावा.

Latest Posts

Don't Miss