विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई (Mumbai) : लोकांच्या आर्थिक कमाईनुसार प्रत्येक बँक आपल्या ग्राहकांसाठी कर्ज देत असतात. त्यामुळे त्यांना आर्थिक सहाय्य मिळत असते. जर तुम्हीही कोणत्या बँकेकडून कर्ज घेण्याच्या विचारात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.
ही बातमी HDFC बँकेच्या संदर्भात आहे. या बँकेने पुन्हा एकदा त्यांच्या कर्जाच्या दरात वाढ केली असून, त्यामुळे आता कर्जदात्याना जास्त व्याजदर द्यावा लागणार आहे. या नवीन नियमानुसार आता बँकेचे व्याजदर किती असतील हे जाणून घेऊयात.
MCLR मद्ये वाढ –
HDFC त्यांच्या ठराविक कर्जावर मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट (MCLR) मद्ये ०.०५ % म्हणजेच ५ बेस पॉईंट्सची वाढ केली आहे. ज्यामुळे ग्राहकांना कर्ज महाग मिळणार आहे. याचाच परिणाम म्हणजे आता EMI मद्ये वाढ होणार आहे. त्यामुळे आता ग्राहकांची चिंता वाढणार आहे.
नवीन दर कधी लागू –
एमसीएलआरचे नवीन दर ७ नोव्हेंबर पासून लागू झाले आहेत. यात एका दिवसाच्या कर्जासाठी MCLR ९.१० टक्क्यांवरून ९.१५ % एवढा झाला आहे. तसेच एक महिन्याचा एमसीएलआर दर ०.०५ टक्क्यांनी वाढून ९.२० % झाला आहे. या उलट इतर मॅच्युरिटीच्या कर्जासाठी एमसीएलआर दरामध्ये कोणतेही बदल झालेले नाहीत.
बेंचमार्क दर –
एका वर्षासाठीचा बेंचमार्क एमसीएलआर दर हा ९.४५ % आधी होता तसाच ठेवण्यात आला आहे. जो प्रामुख्याने कार लोन आणि पर्सनल लोनसाठी लागू होतो. सप्टेंबर २०२४ मद्ये एचडीएफसी बँकेने होम लोन कार लोन आणि पर्सनल लोन यासारख्या कर्ज दरात वाढ केली होती.
RBI पॉलिसी रेपो रेट –
RBI चे गव्हर्नर दास यांनी आपला पॉलिसी रेपो रेट ६.५टक्क्यांवरच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतरच एचडीएफसी बँकेने हे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.