Latest Posts

शेतकऱ्यांना, युवांना व सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प : भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : कररचनेत मोठे बदल करून सर्वसामान्यांना दिलासा देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोट्यवधी देशवासियांचा विश्वास सार्थ ठरवलाय. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्प शेतकरी, युवा, महिला, कौशल्य विकास, रोजगार, पायाभूत सुविधांची उभारणी, शहरांचा विकास अशा विविध नवघटकांवर लक्ष केंद्रित करणारा नवरत्न अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करताच युवकांच्या कल्याणासाठी भरिव तरतूद रोजगाराला चालना देणारा आणि विकसित भारत संकल्पनेला बळ देणारा अर्थसंकल्प असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी सांगितले.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग सातव्यांदा आज देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प मांडला. निर्मला सीतारामन यांनी गरीब, महिला, युवा, शेतकरी या घटकांवर भर देतानाच कृषी व संलग्न क्षेत्रासाठी १.५२ लाख कोटींची तरतूद तसेच शेती क्षेत्रात उत्पादकता वाढवण्यासाठी डिजिटल स्ट्रक्चर पुरवण्याचा निर्णय कृषी क्षेत्राबरोबर शेतकऱ्यांना बळ देणार आहे.

देशातील युवांकरिता ५० लाख अतिरिक्त रोजगार, ग्रामीण भागाचा कायापालट करण्याकरिता २.६६ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.
पायाभूत सुविधांसाठी ११ लाख कोटी रुपयांची करण्यात आले.

सोबतच नवीन कररचना सर्वसामान्यांना दिलासा देणारी असून या निर्णयाचा स्वागत करतो असा विश्वास जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी व्यक्त केला.

Latest Posts

Don't Miss