– भन्ते भागीरथ यांनी केले जनसमुदायास मार्गदर्शन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / चामोर्शी (Chamorshi) : जिल्हा गडचिरोली व चामोर्शी तालुक्यातील अरण्यवास बुद्ध विहार कोठरी येथे १६ नोव्हेंबर रोजी आ डॉ.देवराव होळी व विविध जिल्ह्यातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत भव्यदिव्य वर्षावास समापन सोहळा पार पडला असून, सोहळ्याला विविध जिल्ह्यातील असंख्य धार्मिक भक्तांनी उपस्थिती दर्शविल्यामुळे बुद्ध विहार कोठरी परिसरात फार मोठा जनसागर उसळून आला होता. भन्ते भागीरथ यांनी दुपारी २.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत उपस्थित जनसमुदायास उपयुक्त व मौलिक असे मार्गदर्शन केले.
१५ नोव्हेंबरच्या रात्री ७ ते १६ नोव्हेंबरच्या पहाटे ५ वाजेपर्यंत महापरित्राण पाठ, सकाळी ५ ते ६ पर्यंत कठीण चिवरदान, ६ ते ७ पर्यंत दैनंदिन पूजा वंदना, ९ ते ११ धम्म प्रवचन , सकाळी ११ ते दुपारी १२ पर्यंत भिक्खू संघांना भोजनदान, दू १२.३० ते २.३० पर्यंत भिक्खू संघाचे धम्म प्रवचन, दू २.३० ते ६ पर्यंत मान्यवरांचे मार्गदर्शन, सायंकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत दैनंदिन पूजा वंदना अशी कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली होती.
रात्री ११ वाजता महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध प्रबोधनकार अशोक सरस्वती बोधी नागपूर, विद्याराज कोरे मोर्शी यांचा संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बुद्ध विहार परिसरात वर्षावास समापन सोहळ्यासाठी गेल्या दहा दिवसापासून जय्यत तयारी सुरू होती. बुद्ध विहारातील सर्व परिसर व मंदिर सजावट करून, रोषणाई करण्यात आली. येणाऱ्या सर्व उपासक उपसिकांसाठी चहा नास्ता व बाहेर जिल्ह्यातुन येणाऱ्यासाठी भजनाची व्यवस्था करण्यात आली होती. नियमबद्ध सोहळ्यात गाडी मोटारसाठी पार्किंगची व्यवस्था, कोणत्याही समाजाचा व्यक्ती धार्मिक स्थळी येऊ शकतो मात्र तो बाजाराप्रमाणे येऊन कोणत्याही प्रकारची नशापाणी करून येऊ नये, तसे आढळल्यास त्याचा अपमान त्यालाच कळेल असे सूचित करण्यात आले होते. विविध ठिकाणी सूचना फलक लावण्यात आले होते.
विहार परिसरात अनेक प्रकारचे टॉल लागले होते गर्दी अफाट असल्यामुळे एक दुसऱ्याचा थांग पत्ता लागत नव्हता अशा प्रकारे भव्यदिव्य वर्षावास समापन सोहळा कोठरी येथील बुद्ध विहार परिसरात संपन्न झाला. सोहळा पार पाडण्यासाठी बुद्ध विहारातील अनुयायी, माडे मुधोली येथील सर्व समाज बांधव परिसरातील उपासक उपसिका यांनी सहकार्य केले.