Latest Posts

जि.प. शिक्षकांच्या बदल्यांकरीता अवघड शाळांची तात्पुरती यादी प्रसिद्ध

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : ग्रामविकास विभागाचे १८ जून २०२५ रोजीचे शासन निर्णयातील मुद्या क्रमांक १.१ व परिशिष्ट-०१ मधील तरतुदीनुसार शिक्षक संवर्गाच्या सर्वसाधारण बदली प्रक्रियेकरीता जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यान्वीत शाळांचे अवघड/सर्वसाधारण क्षेत्रात निश्चितीकरणाचे निर्देशानुसार संदर्भिय-०३ नुसार खालीलप्रमाणे जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली. सदर शासन निर्णयातील परिशिष्ट-०१ मध्ये नमूद (०७ मुद्यांचे अनुषंगाने संबंधित विभागाकडून माहितो मागविण्यात आली तसेच तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी यांचेकडून सुद्धा उलटतपासणी करण्याचे दृष्टीने माहिती मागविण्यात आली व माहितीचे संकलन करण्यात आले. शाळांना अवघड व सर्वसाधारण क्षेत्र म्हणुन निश्चित करतांना वरोल संदर्भिय शासन निर्णयातील निर्देशानुसार जिल्ह्याच्या भौगोलिक व स्थानिक स्थितीचा विचार करुन निकषामध्ये आवश्यक ते बदल करण्याचे अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीला दिलेले आहेत.

प्राथमिक शिक्षकांच्या सन २०१८ व सन २०२२ मध्ये ऑनलाईन बदली पोर्टलवर झालेली बदली प्रक्रिया, न्यायालयात दाखल याचिकांमध्ये न्यायालयाने दिलेले निर्देश, जिल्ह्यातील रिक्त पदांचा समतोल राखणे, शाळांमध्ये शिक्षकांची उपलब्धता होणे तसेच भौगोलिक व स्थानिक परिस्थिती याचा शाळांना स्वतः व पर्यवेक्षकीय यंत्रणेच्या मार्फतीने भेटी देऊन सविस्तर अभ्यास करुन संबंधित विभागाने जरी माहिती सादर केली असेल तरीही सदर माहितीचा नेमुन दिलेल्या मुख्यालयी राहणा-या शिक्षकांच्या शासकीय सेवेमध्ये निर्माण होणारे परिणाम, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक बाबीमध्ये निर्माण होणारी अडचण, शैक्षणिक सत्रामध्ये विविध शैक्षणिक बाबींचे अनुषंगाने जिल्हा स्तरावर प्राप्त होत असलेल्या तक्रारीतील चाबी याचा सारासार विचार करुन माहिती सादर करण्यास जिल्हास्तरीय समितीचे २५ फेब्रुवारी २०२५ रोजीचे सभेमध्ये सर्व गटविकास अधिकारी/गटशिक्षणाधिकारी यांना सुचना देण्यात आले.

त्यानुसार पंचायत समितीकडून तसेच संबंधित विभागाकडून प्राप्त माहिती तसेच ग्रामविकास विभागाचे शासन पत्र ०५ मार्च २०२५ मधील निर्देशाचे आधारे समितीला दिलेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्ह्यातील शाळांची अवघड व सर्वसाधारण क्षेत्रात निश्चिती करण्यास याद्वारे तात्पुरती यादी जिल्हा परिषदेच्या www.cpgadchiroli.org/in या संकेतस्थळावर, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सुचनाफलकावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

सदर यादीवर काही आक्षेप असल्यास संबंधित शिक्षकांना यादी प्रसिद्धीचे दिनांकापासून ०२ दिवसाचे आत केंद्रप्रमुख यांचे मार्फतीने पुरावादाखल दस्ताऐवजासह आक्षेप सादर करता येईल. मोघम व अनावश्यक तांचे आधारे पुरावादाखल दस्ताऐवजाविना सादर केलेल्या आक्षेपाची दखल घेतल्या जाणार नाही, त्यामुळे अशाप्रकारचे आक्षेप सादर करुन प्रशासनाच्या वेळेचा अपव्यय करु नये तसेच क्षेत्र निश्चितीसंबंधाने खोटे, दिशाभूल करणारे दस्ताऐवज सादर केल्याची बाब प्राप्त तक्रारीनुसार अथवा जिल्हास्तरावरुन संबंधित विभागाकडून घेण्यात आलेली माहिती व शिक्षकांनी सादर केलेल्या माहितीच्यातपासणीअंती निदर्शनास आल्यास संबंधितांवर उचित शिस्तभंगविषयक कार्यवाही करण्यात येईल याबाबत सक्त सूचना देण्यात आलेले आहे.

सर्व गटविकास अधिकारी / गटशिक्षणाधिकारी यांनी विस्तार अधिकारी (शिक्षण) / केंद्रप्रमुख यांचे मार्फतीने तालुक्यातील सर्व शिक्षकांना अवगत करुन देण्यात यावे. शिक्षकांकडून प्राप्त आक्षेप केंद्रप्रमुख संकलन करतील व स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन तर्कशुद्ध अभिप्राय नोंदवून गटशिक्षणाधिकारी यांचेकडे आक्षेप सादर करावयाचे अंतिम दिनांकाचे लगतच्या दुसऱ्या दिवशी सादर करतील, गटशिक्षणाधिकारी यांनी प्राप्त आक्षेपाचे अवलोकन करुन शासन निकषातील तरतुदीशी व वरीलप्रमाणे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हिताशी विसंगत आक्षेप तालुकास्तरावरुन अमान्य करुन एक व्रत व उर्वरीत आक्षेप लगतच्या दुस-या दिवशी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांचेकडे सादर करतील. अमान्य केलेल्या आक्षेपाचे वाबतीत शिक्षकांना शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांचेकडे लगतच्या दुसऱ्या दिवशी अपील सादर करता येईल. क्षेत्रनिश्चिती संबंधी प्रत्येक बाबींचे अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. गडचिरोली यांचे निर्णय हे अंतिम राहतील.

Latest Posts

Don't Miss