Latest Posts

प्रवासी कार्यकर्ता व बूथ संयोजक यांनी गावा- गावात जाऊन गाव चलो अभियान पूर्ण करावे : लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे

– भाजपा तालुका आरमोरीची गाव चलो अभियान कार्यशाळा संपन्न
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli ) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने देशात सर्व क्षेत्रात प्रचंड गतीने विकास केलेला आहे. गरीब कल्याण, महिला सशक्तिकरण, देशाची अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा अशा अनेक क्षेत्रात मोदी सरकारने मोठी कामगिरी करत आंतरराष्ट्रीय पातळीवरील देशाचे नाव उंचावले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बूथ संयोजक व प्रवासी कार्यकर्ता यांनी गावा- गावात जाऊन बूथ रचना तयार करावी, पन्ना प्रमुख नियुक्त करणे, नवीन मतदातांनी करून केंद्र व राज्यसरकारच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती तेथील नागरिकांपर्यंत पोहोचवावी आणि गाव चलो अभियान पुर्ण करावे, असे प्रतिपादन लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे यांनी केले.

भारतीय जनता पार्टी आरमोरी तालुक्याची गाव चलो अभियान कार्यशाळेचे आयोजन ठाणेगाव येथे करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

यावेळी आमदार कृष्णाजी गजभे, जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, जिल्हा सचिव नंदू पट्टेवार, तालुका अध्यक्ष पंकज खरवडे, भारत बावनथडे, नगराध्यक्ष पवन नारनवरे, पडोले, निता ढोरे, भास्कर बोडणे, श्रीहरी कोपुलवार, ईश्वर पासेवार, डॉ. ओमप्रकाश नाकाडे भाजपा पदाधिकारी, प्रवासी कार्यकर्ता, सुपर वारीयर्स, बूथ पालक व बूथ प्रमुख उपस्थितीत होते.

Latest Posts

Don't Miss