विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : तालुक्यातील महागाव बुज येथील रहिवासी राकेश अनिल मडावी (२८) यांची प्रकृतीत अचानक बिघाड झाला. अशात त्यांच्या कुटुंबाकडे उपचारासाठी पुरेसे पैसे नव्हते. त्यामुळे संपूर्ण कुटुंब विवंचनेत सापडला होता. सदर माहिती सामाजिक कार्यकर्ते नागेश करमे कळाली आणि त्यांनी ही गोष्ट माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री आत्राम यांच्या कानावर टाकली लगेच भाग्यश्री आत्राम यांनी राकेश मडावीच्या उपचाराकरिता दहा हजार रुपयांची आर्थिक मदत पाठवली.
महागावात एकच कुटुंबातील एकापाठोपाठ पाच जणांच्या संशयास्पद मृत्यूने संपूर्ण गाव अवाक झालेला आहे. याच कुटुंबातील व्यक्तींना राकेश मडावी याने उपचारासाठी रुग्णालयात वाहनाने नेले होते. मृत कुटुंबीयांकडे तो वाहन चालक म्हणून काम करीत होता. रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्या करिता गेला इतकेच निमित्य आणि तो देखील खाटेवर पडला. त्याचे अहेरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतु प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळे समोरील उपचारासाठी जिल्हा ग्रामीण रुग्णालय चंद्रपूर येथे हलविण्यात आले. घरची परिस्थीती बेताची असल्याने वरील उपचारासाठी पैशाची अडचण भासत होती.
इतक्यात भाग्यश्री मडावी कुटुंबियांच्या मदतीला सरसावली. त्यांचे खंदे समर्थक नागेश करमे यांनी भाग्यश्री आत्राम यांच्या माध्यमातून राकेश मडावी यांच्या कुटुंबियांना दहा हजार रुपयांची आर्थिक मदत मिळवून दिली. त्याबद्दल मडावी पारिवारांनी भाग्यश्री आत्राम यांचे आभार व्यक्त केले. यावेळी नागेश करमे, श्रीहरी आलाम, शंकर झाडे, बापू आलाम, तुकाराम आत्राम इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.