Latest Posts

आदिवासी हक्क संघर्ष कृती समिती तर्फे ७ ऑक्टोबर ला विशाल आक्रोश मोर्चा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधि / चंद्रपूर (Chandrapur) : ७ ऑक्टोबर रोजी विविध मागण्या घेऊन आदिवासी हक्क संघर्ष कृती समिती चंद्रपूर तर्फे विशाल आक्रोश मोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे. मोर्चा शहीद भूमी बाबुराव पुलेश्वर शेडमाके स्मारक येथून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालय वर धडक देणार असून जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार आहेत.

धनगर ही जात आहे, जमात नाही त्यामुळे त्यांन आदिवासीचे कुठलेही संविधानीक अधिकार देऊ नये. सुप्रिम कोर्टाने धनगर हे अनु. जमातीच्या कुठल्याही निकषात बसत नाही हे स्पष्ट केले असतांना अभ्यासगटाची निर्मिती असंवैधानिक आहे. टाटा इन्स्टीट्यूट ऑफ सोशल साइन्सस च्या अहवालानुसार धनगर हे आदिवासी नाहीत हे सिध्द झालेले आहे. मुख्यमंत्री यांनी धनगड आणि धनगर एकच आहे यासाठी नेमलेली समिती रद्द करण्यात यावी. महाराष्ट्रातील १३ जिल्हातील १० संर्वगातील पेसा भरती त्वरीत घेण्यात यावी. चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी जन संख्या असणाऱ्या सर्व गावांना पेसाक्षेत्रात नव्याने समाविष्ठ करण्यात यावे. अनु, जमातीतील रिक्त असलेला ८० हजार पेक्षा जास्त जागेची विशेष पदभरती करण्यात यावी. ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्या येत असलेला परिसरातील आदिवासी च्या जमिनीवर गैरमागनि बांधकाम केलेले रिसोर्ट मुळ मालकाला परत करण्यात यावे. महाराष्ट्रातील आदिवासी विकास विभागाच्या सर्व खाजगी अनुदानित आदिवासी आश्रमशाळा कायमस्वरूपी बंद करण्यात याव्यात. आदिवासी विकास विभाग अंतर्गत प्रकल्प कार्यालया चंद्रपूर येथे नव्याने बांधण्यात आलेली इमारत गळती (चार महिण्यात) प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी. आदिवासी विकास विभगामार्फत काढण्यात आलेले निविदा मध्ये आदिवासी बचतगट, बेरोजगार समुह, आदिवासी बहुउद्देशीय संस्था यांनाच काम देण्याचे स्वतंत्र्य शासन निर्णय काढण्यात यावा. आदिवासी उपाय योजने अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना मार्फतीने देत असलेला निधी काही चुकीच्या शिर्षकावर देण्यात येणारा निधी बंद करण्यात यावा. महाराष्ट्र राज्यातील आदिवासी विभागाअंतर्गत चालविलेल्या वसतीगृहातील भड्याच्या इमारती बंद करून स्वतंत्र वस्तीगृह इमारती उभारण्यात याव्यात. चंद्रपूर जिल्हातील आदिवासी विभागा अंतर्गत येत असलेले प्रकल्प कार्यालय, शबरी व वित्त महामंडळ व अनुसुचित जमाती पडताळणी समिती कार्यालय एकाच इमारतीमध्ये देण्यात यावे. आदिवासी विभागाअंतर्गत देण्यात येणाऱ्या वस्तीगृहातील मासिक भत्यात १ हजार रू. व डीबीटी योजनेला मासिक ५ हजार रूपये करण्यात यावा. आदिवासी विभागाअंतर्गत आश्रमशाळा व वसतीगृह येथे कंत्राटी भरतीमध्ये आदिवासी समुहातील उमेदवाराच घेण्यात यावा.  आदिवासी शबरी वित्त महामंडळ अंतर्गत स्वयंरोजगारकरीता आदिवासी बेरोजगार युवकांना व्यवसाया करीता १००% अनुदानावर वित्त पुरवठा करण्यात यावे. महात्मा रावण आदिवासी दैवत असल्यामुळे त्यांचे दहन करण्यात येवू नये. आदिवासींच्या बजेटचे ७ हजार कोटी रूपये लाडकी बहीण योजनेसाठी वळविलेली निधी सदर विभागास परत करणे. पेसा अंतर्गत १७ संवर्ग पदभरती १३ जिल्हयात पदभरती तात्काळ करणे व ह्यासाठी तयार करण्यात आलेल्या रोस्टरची दुरूस्ती करण्यात यावी. सुप्रिम कोर्टने दिलेल्या १ ऑगस्ट २०२४ चा अनू. जाती/अनू, जमाती सामाजिक वर्गीकरण लागू करण्यात येवू नये यासाठी पूर्नरावलोकन याचिका शासनाने दाखल करावी. ६ जुलै २०१७ च्या सर्वोच न्यायालयाचा अधिसंच निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करणे. जिल्हा मध्यवर्ती कारागृह, चंद्रपूर येथील कारागृह हटवून ती जागा आदिवासींच्या साहीत्य संग्राहासाठी मोकळी करण्यात यावे. मौजा-राणतळोधी ता व जि. चंद्रपूर येथील पूनर्वसन थांबवून तेथील भद्रावती स्थानिक आदिवासींना वनहक्क पट्टे देवून स्थानिक समस्या तात्काळ सोडविणे. आदिवासी शेत जमिनीच्या गैर आदिवासी कब्जात असलेल्या लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल करा. विज सवलत देण्यात यावे. चंद्रपूर जिल्हा हा ५ वी ६ वी अनुसुचित मध्ये समाविष्ट करण्यात यावी. जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरल्यास सदर व्यक्त्तिवर २३/२००० च्या कायद्यातील तरतुदीनुसार सदर व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. चंद्रपुर जिल्ह्यातील नियोजित व्याघ्र प्रकल्प ग्रस्त लोकांचे नियमानुसार पुनर्वसन करुन तात्काळ मुलभुत तथा आवश्यक सोयी सुविधांची पुर्तता करण्यात याव्यात असे विविध मागणी घेऊन मोर्चा काढणार आहे.

या मोर्च्यात गोंडवाना गणतंत्र पाटी, जि. चंद्रपूर, आफ्रोट संघटना, आदिवासी टायगर सेना, चंद्रपूर, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली विभाग, जागतीक गोंडसगा नांदी, गोंडीयन सामाजिक सहायत्ता कल्यान संस्था, चंद्रपूर, गोंडी धर्मीय आदिवासी एकता संघटना, भद्रावती, अखिल भारतीय परधान महासंघ, आदिवासी जनचेतनेचा जागर, शहीद बाबूराव पुलेश्वर शेडमाके स्मारक समिती, चंद्रपूर, बिरसा क्रांती दल, चंद्रपूर, बिरला बिग्रेड, चंद्रपूर, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद युवा, आदिवासी विद्यार्थी संघर्ष कृती समिती, चंद्रपूर, खांडक्या बल्लारशाह स्मारक समिती, बल्लारशाह, रायसेंटर, चंद्रपूर, आदिवासी इमाइज फेडरेशन शाखा चंद्रपूर, नारायण उईके संघर्ष समिती, चंद्रपूर, विर बाबुराम पुलेश्वर शेडमाके बहुउद्देशीय संस्था, चंद्रपूर, गोंडवाना राज्य गणरक्ष समिती, चंद्रपूर, रावेन सेना, राणी हिराई महिल संघटना, जय जंगोम विर बापुराव शेडमाके सेना आदी संघटना सहभागी होणार आहेत.

Latest Posts

Don't Miss