– पशुधन विकास अधिकारी म्हणून डॉ. चेतन अलोने यांची निवड
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) पशुधन विकास अधिकारी या पदासाठी घेण्यात आलेल्या २०२२ च्या मुख्य परीक्षेच्या निकाल २० ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आला. यात अहेरी येथील डॉ.चेतन अलोने यांनी नेत्रदीपक यश प्राप्त केले आहे. त्याबद्दल माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी चेतन अलोने यांना शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. अहेरी क्षेत्रातील विद्यार्थी हे हळूहळू राज्यस्तरावर आपल्या गावाचे व जिल्ह्याचे नाव लौकीक करीत आहे हे आपल्यासाठी गौरवाची बाब असल्याचे राजे अंब्रिशराव आत्राम यांनी म्हंटले.
सद्यस्थितीत अलोने हे पश्चिम बंगालच्या कोलकाता येथे वेटेरिनिरी क्षेत्रातील देशात प्रसिद्ध असलेल्या प्रीमियम चिक फीड कंपनीत कार्यरत आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते व भाजपा पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
डॉ.चेतन अलोणे यांचे राजे अंब्रिशराव आत्राम यांच्या संस्थेत माध्यमिक शिक्षण धर्मराव कृषी विद्यालय, अहेरी येथे झाल्याणे येथील सेवानिवृत्त प्राचार्य प्रमोद दोन्तुलवार तसेच राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षिका जयश्री खोंडे, यांनी सुद्धा डॉ.चेतन अलोणे यांचे सन्मान व अभिनंदन करून भेटवस्तु दिले. तसेच विविध स्तरावरुण डॉ.चेतन अलोणे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केल्या जात आहे.