विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : वर्धा विभागातील २५ वर्ष विना अपघात सेवा देणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस चालकांना स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत सपत्नीक विशेष गौरव, सत्कार करण्यात आला.
स्वातंत्र्यदिनी वर्धा बसस्थानकात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभाग नियंत्रक संदीप रायलवार तर प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसिलदार बाळूताई भागवत, अजय धर्माधिकारी, विभागीय वाहतूक अधिकारी विजय धायडे, सहाय्यक अभियंता रामचवरे, सुरक्षा व दक्षता अधिकारी श्रीमती लेणे, आगार व्यवस्थापक युवराज राठोड उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्याहस्ते सेवानिवृत्त १८ व कामगिरीवर असलेल्या ३ अशा एकून २१ चालकांना पत्नीसह २५ हजार रुपयांचा धनादेश, बिल्ला, स्मृतिचिन्ह व चालकाच्या पत्नीस साडी व खनासह पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सत्कार करण्यात आलेल्या चालकांमध्ये वर्धा आगारातील सेवानिवृत्त चालक भोजराज थुल, अनिल माळोदे, ग्योसोद्दीन रफीकोद्दीन काझी, यशवंत दादाजी बावस्कर, हिंगणघाट आगारातील रविंद्र मांडवे, मारोती लांडगे, उत्तमराव धुमाळ, मोरेश्वर मुडे, गुलाबराव कळसकर, दिलीप आडे, चिंटू राडे, आर्वी आगारातील भगवान इंगळे, रामदास जाने, राजेश पंधरे, गणेश पडोळे, विनोद पाचकवडे, दिलीप सरोदे, अरुण इंगळे, किशोर रायकवार, तळेगाव आगारातील रऊफखा मोहंम्मदखा पठान तर पुलगाव आगारातील चंद्रमणी कांबळे यांचा समावेश आहे.