Latest Posts

दोन दुचाकींची एकमेकांना धडक : एक जण गंभीर जखमी

– आसरअल्ली येथे डॉ. साथमवर यांना नियुक्ती करण्याबाबत मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना निवेदन 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : दोन दुचाकी आसरअल्ली ते अंकिसा जात असताना विरुद्ध  दिशेने अंकिसा ते आसरअल्ली कडे येणारी दुचाकी एकमेकांना धडक दिली. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना ०४ फेब्रुवारी २०२४ ला रविवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास हि घटना घडली.

सदर अपघातामध्ये गंभीर जखमी असलेल्या व्यक्तीमध्ये उथाराजी मधुकर रा. तेखडामोटला येथील या अपघातग्रस्त व्यक्तीला महिंद्रा पिकअप ने प्राथमिक आरोग्य पथक आसरअल्ली मध्ये पोहचले तेव्हा तिथे एकही कर्मचारीव डॉक्टरही उपस्थित नव्हते. त्यावेळी गावातील २० ते ३० लोक जमले.

यावेळी सर्व गावातील लोकांनी मिळून अपघातगग्रस्त व्यक्तीला महिंद्रा पिकअप ने अंकिसा येथे रवाना केले. त्यांनतर अंकिसा  वरून सिरोंचा ला रेफर केले. अशी परिस्तिथी आसरअल्ली येथील लोकांना प्राथमिक उपचार करण्यासाठी एकही आरोग्य कर्मचारी किंवा डॉक्टर उपस्थित राहत नाही.

त्याकरिता डॉ. साथनवार यांना आसरअल्ली येथे नियुक्ती केले नाही तर सर्व गावकऱ्यांनी मिळून प्राथमिक आरोग्य पथकाला कुलूप लावण्यात येईल.

आसरअल्ली हे सिरोंचा तालुक्यातील महत्वाचे व गडचिरोली जिल्हयातील लोकसंख्येच्या बाबतीत आसरअल्ली हा सर्वांत मोठे गाव आहे. या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र असून त्यात रुग्णावर उपचाराची काहीही व्यवस्था नाही, येथील प्रत्येक रुग्णाना ५० कि.मी अंतरावर उपचारासाठी जावे लागते. गरोदर मातांना साधी प्रसूती (डिलिव्हरी) पण करू शकत नाही, अशी व्यवस्था आहे.

प्राथमिक आरोग्य पथक आसरअल्ली मध्ये डॉक्टर नाही परिचारिका नाही CHO हा पदाचा उपयोग सर्वेक्षण (Survey) करण्यासाठी आहे शासनाला अहवाल सदर करण्यासाठी हा पदाची निर्मिती केले आहे.  साधा ताप आला तरी तेलंगणा ला जावा लागतो डेंगू, मलेरिया रुग्ण वाढत आहे फवारणी करत नाही एक पण पस्तुती होत नाही सगळे प्रस्तुती तेलंगणा मध्ये जाऊन करत आहे असा सागत गेल्याने खूप समस्या आहे.

आसरअल्ली गावाला जवळपास २० खेडे गाव थेट बाजाराशी जोडले गेले असल्याने येथे डॉ. साथमवर नियुक्ती केल्यास आसर आसरअल्ली सोबतच जवळपासच्या २० खेडे गावाचा लोकाना रुग्णालयाचा फायदा होणार आहे.

करिता या मागणीचे शासनाने गंभीरतेने लक्ष देवून ताबडतोब आसरअल्ली येथे डॉ. साथमवर यांना नियुक्ती करावेत व आसरअल्ली व इतर गावकऱ्यांना मदत होईल. करिता धर्मराव बाबा आत्राम यांना निवेदन देऊन कडविण्यात आले.

Latest Posts

Don't Miss