Latest Posts

पशुसंवर्धन विभागांतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज करावे

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara) : राज्य ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार युवकासह पशुपालक शेतकरी बांधवाना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन विभाग विविध योजना राबवित आहे. पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वैयक्तिक लाभाच्या  योजनांतर्गत प्रक्रिया अधिक पारदर्शक करणेसाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेमध्ये गेली चार वर्षे ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविणे व लाभार्थी निवड करण्याची पध्दत सुरू करण्यात आली आहे.

सन २०२१-२२ पासून जिल्हास्तरीय विविध योजनांसाठी सुद्धा सदर संगणक प्रणाली लागू करण्यात आली आहे. यामध्ये शासनाने एखाद्या योजनेकरिता अर्ज केल्यानंतर त्यात दरवर्षी पुन्हा अर्ज करावे लागू नये यासाठी तयार केलेली प्रतिक्षायादी सन २०२१-२२ पासून पुढील ५ वर्षापर्यंत म्हणजे सन २०२५-२६ पर्यंत लागू ठेवण्याची सोय केली आहे.

त्यामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली असून, त्याची प्रतिक्षा यादीतील क्रमांकानुसार अंदाजे केव्हा लाभ मिळेल हे कळू शकल्यामुळे लाभार्थी  हिस्सा भरणे किया इतर बाबीकरिता नियोजन करता येणे शक्य होणार आहे.

त्या नुसार नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेंतर्गत दुधाळ गाई- म्हशीचे गट वाटप करणे, शेळी-मेंढी गट वाटप करणे, १ हजार मांसल कुक्कुट पक्षांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे, १०० कुक्कुट पिलांचे वाटप व २५+३ तलंगा गट वाटप या योजनांसाठी ऑनलाईन पध्दतीचे लाभार्थी निवड  प्रक्रिया सन २०२३-२४ या वर्षात राबविली जाणार आहे.

त्यामुळे पशुपालकांना डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालन यापैकी ज्या बाबींमध्ये अर्ज करावयाचा आहे. त्यांची निवड करण्याची सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. राज्यातील पशुपालक शेतकरी बांधव, सुशिक्षित बेरोजगार युवक व युवती व महिलांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज दाखल करावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागानी कळविले आहे.

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ https://ah.mahabms.com तसेच अँड्रॉईड मोबाईल ॲप्लिकेशनचे नाव – AH. MAHABMS Google play स्टोरवरील  मोबाईल ॲपवर उपलब्ध आहे. अर्ज करण्याचा कालावधी ते ८ डिसेंबर २०२३ पर्यत करता येतील. तसेच टोल फ्री क्रमांक- १९६२ किंवा १८००-२३३-०४१८ वर देखील संपर्क साधता येईल.

योजनाची संपूर्ण नाहितरी संपूर्ण मोबाइल पर उपलब्ध आहे. स्विकारले यातील या संगणकप्रणाली असून आणि बहुतांशी माहिती  व पर्यायाची सुविधा उपलब्ध आहे .अर्ज भरण्याकरिता  अर्जदारांनी स्वतच्या मोबाईलचा जास्तीत वापर करावा.दिलेल्या मोबाईलवर पुढील माहितीचे  संदेश येणार असल्याने काही परिस्थितीत अर्जदाराने योजनेंतर्गत आपला मोबाईल बदलून अर्ज केलेल्या अर्जदारानी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.

योजनांची संपूर्ण माहिती तसेच अर्ज करण्याची पध्दत याबाबत संपूर्ण तपशील या संकेतस्थळावर तसेच मोबाईल ॲपवर उपलब्ध आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने स्विकारले जातील.या संगणकप्रणालीमध्ये अर्ज भरणे अत्यंत सुलभ करण्यात आले असून,अर्जामधील माहिती कमीत कमी टाईप करावी,लागेल आणि बहुतांशी माहितीबाबत पर्याय निवडण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.त्यामुळे पशुपालकांनी अर्ज भरण्याकरिता स्वत:चे मोबाईलचा जास्तीत जास्त वापर करावा.

त्यामुळे योजनेबाबत अधिक माहितीसाठी वरील टोल फ्री क्रमांकावर किंवा तालुक्यांचे पशुधन विकास अधिकारी विस्तार, पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा उपआयुक्त कार्यालय, तालुका लघुपशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा, असे आवाहन पशु संवर्धन विभागातर्फे करण्यात येत आहे.

Latest Posts

Don't Miss