– भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीच्या वतीने एक दिवा वंचितांच्या घरी पालावरची दिवाळी सन म्हसाळा येथील वडार वस्तीत साजरा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : भारतीय सण, समारंभ आणि उत्सवांपासून दूर राहिलेल्या वंचित समाजाच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी सजग राजकीय पक्ष म्हणून भाजपा तर्फे दिपावली दिपोत्सवा दरम्यान एक दिवा वंचितांच्या घरी प्रत्येक पालावर लावून सर्व वंचित घटकांना हिंदू बांधव म्हणून सामावून घेण्याचा संकल्प केला आहे, त्यानुसार आज पालावर दिवाळी साजरी करण्यात येत असुन सर्व कुंटुंबीयासोबत दिवाळी साजरी करतांना एक अभुतपूर्व असा आनंद मिळत असल्याचे यावेळी खासदार रामदास तडस म्हणाले.
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार समाजातील वंचितांना भारतीय हिंदू संस्कृती, सण, समारंभात सामील करून त्यांचे जीवन अधिकाधिक प्रकाशमय करण्यासाठी यावर्षी राज्यभर भाजपाच्यावतीने असे कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून म्हसाळा ता.जि. वर्धा, येथील वडार वस्तीवर पालावरची दिवाळी साजरी करण्यात आली.
याप्रसंगी खासदार रामदास तडस, वर्धेचे आमदार डॉ. पंकज भोयर, कामगार मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश महामंत्री मिलिंद देशपांडे, कामगार मोर्चा जिल्हा अध्यक्ष अभय नगरे, वडार समाजाचे जिल्हा अध्यक्ष- नेते रामू लष्कर, धर्म जागरण, रा.स्व. संघ चे कार्यकर्ते प्रकाश पवार, वडार वस्ती चे प्रमुख राजू इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी ७५ कुटुंबांना दिवाळी फराळ व फटाक्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी मिलिंद देशपांडे यांनी दिवाळी साजरी करण्याबाबत व त्याची संकल्पना सांगितली, खासदार रामदासजी तडस, आमदार पंकज भोयर यांनी वस्ती च्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचे सांगितले, व दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या, भावनिक वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाचे संचालन व आभार भाजपा कामगार आघाडीचे अध्यक्ष अभय नगरे यांनी केले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सतिश अड्डे, गजानन झाडे, संजय तिवारी, अमेय चौबे, अविनाश बाभुळकर, मनोज नरांजे, रामायण राय, मंगेश भोसले, श्याम लाहोरे, शुभम अवधूत, उमेश अग्निहोत्री, सुनिल पिसुड्डे, सुनिल धोबे, मोहन राय, अमित गावंडे, सुरेंद्र लवने, प्रभाकर मराठे, रामायण राय, दिपक भुतडा, राहुल करंडे व इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.