Latest Posts

कोरोना भत्ता मिळेपर्यंत संघर्ष सुरु राहणार : कॉ. सुनंदा बावणे

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड (Bhamragad) : कोरोना काळात काम करवून घेण्याकरीता ग्रामस्तरावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका तसेच आशा वर्करला कोरोना संपेपर्यंत प्रतिमहा एक हजार रुपये देण्यात येईल, असे शासनातर्फे घोषीत करण्यात आले होते. परंतु प्रत्येक्षात ते दिल्या गेले नाही. कोरोना भत्ता मिळावा. या मागणीला घेऊन मंगला मांझी यांचे अध्यक्षतेखाली मिटींग घेण्यात आली.

प्रमुख अतिथी म्हणून प्रा. रमेशचंद्र दहीवडे उपस्थित होते.

सुनंदा बावणे म्हणाल्या कि, कोरोना भत्ता एक हजार रुपये तसेच अमृत आहार घरपोच पुरविणाऱ्यांना प्रति लाभार्थी पाच रुपये देण्यात येईल, असे घोषीत करण्यात आले होते. मात्र तो देखिल मिळाला नाही.

प्रा. रमेशचंद्र दहीवडे म्हणाले कि, घोषीत केल्यानुसार अंगणवाडी महिलांना कोरोना भत्ता देण्यात यावा. अन्यथा या अन्यायाचे विरोधात तिव्र आंदोलन करण्यात येईल.

जयश्री वाळके यांनी आभार मानले. यावेळी मनिषा पडालवार, श्रीनिवास गुन्नालवार, कविता मुलमुले, भावना डोंगरे आदी उपस्थित होत्या.

Latest Posts

Don't Miss