Latest Posts

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी

– आपत्तीग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत करावी : माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांची मागणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : महाराष्ट्रातल्या दक्षिण गडचिरोलीतील या दोन तीन दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची उभी पिके नष्ट झाल्याने शेतकऱ्यांची अतोनात नुकसान झाली आहे.

राज्य सरकार व संबंधित विभागाने शेतकऱ्यांची पिकांची नुकसानीची तात्काळ पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी आविसं काँग्रेसनेते व माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कांकडालवार यांनी केली आहे.

अवकाळी पावसामुळे दक्षिण गडचिरोलीतील शेतकऱ्यांची धान, हरभरा, खपूस, मिरची, मकासह आदि पिकांची नुकसान झाली. तसेच जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पावसामुळे घराही नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. शेतकऱ्यांच्या हातात आलेल्या उभी पिके या अवकाळी पावसामुळे पूर्णतः नष्ट झाल्याने शेतकरी चिंतातुर झालेले आहे.

या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे पिकांची झालेल्या नुकसानीची मोका पंचनामे करून राज्य सरकारने तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नेते व माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केली आहे.

Latest Posts

Don't Miss