विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : वंचित बहुजन आघाडी घुग्घुस तर्फे पक्ष प्रवेश कार्यक्रमाचे आयोजन २ फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते.
पक्ष प्रवेश कार्यक्रम घुग्घुस येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह लुंबीनी नगर घुग्घुस येथे आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष प्रा. सोमाजी गोंडाने यांच्या अध्यक्षतेखाली व घुग्घुस शहर अध्यक्ष शरद पाईकराव यांच्या नेतृत्वा मध्ये शेकडो महिला व पुरुष यांनी पक्ष प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष प्रा. सोमाजी गोंडाने व जिल्हा पदाधिकारी यांनी पक्ष प्रवेश घेणारे रमा सातारडे, माधुरी चन्नुरवार, नैना कन्नाके, अश्विनी सातपुते, स्मिता कांबळे, जयोती बेंडले, शोभा भालशंकर, सविता मंडपे, वनिता निखाडे, यशोधरा धोटे, कुमुद निखाडे, रंजना राऊत, संगिता वासेकर, आम्रपाली करमनकर, विजय कवाडे, बबन वाघमारे, मिना गुडदे, मंगेश रामटेके व प्रवेश करणार्यास वंचित बहुजन आघाडी चा दुप्पटा व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हाध्यक्ष प्रा. सोमाजी गोंडाने यांनी सर्वांना समोरील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे संचालन रिता देशकर, तर आभार प्रदर्शन माया सांड्रावार, केंद्रीय शिक्षिका यांनी केले. यावेळी वंचित बहुजन आघाडी घुग्घुस शहर अध्यक्ष शरद पाईकराव, शहर उपाध्यक्ष जगदीश मारबते, दत्ता वाघमारे, योगेश नगराळे महासचिव, अशोक भगत कोषाध्यक्ष, राकेश पराशिवे संघटक, आशिष परेकर आयटी सेल प्रमुख, विशाल भगत, नकुल निमसटकर, राकेश कातकर सह घुग्घुस वंचित बहुजन आघाडी कार्यकर्ते उपस्थित होते.