Latest Posts

वांगेपल्ली येथील अप्रोच रस्त्याचे होणार बांधकाम

– मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते उद्घाटन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : तालुक्यातील वांगेपल्ली ते तेलंगाणा पुलापर्यंत अप्रोच रस्त्याचे बांधकाम होणार असून नुकतेच राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते नुकतेच भूमिपूजन करण्यात आले.

वांगेपल्ली ते तेलंगाणाकडे जाणाऱ्या रस्त्याची अंत्यत दुरावस्था झाल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. शिवाय तेलंगाणा राज्याशी रोटीबेटीचा व्यवहार असल्याने या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते. नागरिकांची अडचण लक्षात घेता मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी या अप्रोच रस्त्याचे बांधकाम व मोरी बांधकाम करण्यासाठी तब्बल ९० लक्ष रुपयांची निधी मंजूर केली.

या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. अप्रोच रस्त्याचे मजबुतीकरण झाल्यास केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर तेलंगाणा राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

यावेळी सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, सामाजिक कार्यकर्ते अरुण मुक्कावार, साई बोम्मावार, वांगेपल्लीचे माजी सरपंच पुष्पा आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी तालुका अध्यक्ष श्रीनिवास वीरगोनवार, नगरसेवक अमोल मुक्कावार, वेंकटरावपेठाचे उपसरपंच कीशोर करमे, टाटाजी गेडाम, राकेश तोर्रेम, ताजु कुळमेथे, शैलेश गेडाम, सुमित मोतकुरवार, मखमुर शेख आदी उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss