Latest Posts

वेकोलिचे रक्षक सोहेल खान यांचे सस्ती आरसी येथून चोरट्यांनी अपहरण केल्याची चर्चा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballapur) : बल्लारपूर वेकोली अंतर्गत येणाऱ्या सास्ती उपप्रादेशिक व्यवस्थापक क्षेत्राच्या खुल्या खदानीतून मोठी बातमी समोर येत आहे. वेकोलीचे रक्षक सोहेल खान यांचे सास्ती आरसी येथून चोरट्यांनी अपहरण केल्याची चर्चा होत आहे. काल दुसऱ्या शिफ्टमध्ये ड्युटीसाठी गेलेल्या आरसी ऑफिसमध्ये आपल्या ड्युटीवर तैनात असलेला सुरक्षा रक्षक सोहेल खान सात वाजता घरून गेल्याची माहिती त्यांच्या घरच्यांनी दिली. त्यांची ड्युटी पेट्रोलिंगमध्ये होती आणि त्यांच्यासोबत आणखी तीन गार्ड होते, मग फक्त सोहेल बेपत्ता कसा? ते तीन रक्षक कोण होते? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत, काल ड्युटी संपल्यानंतरही घरातील सदस्य घरी न पोहोचल्याने त्यांनी वेकोलीच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली असता सोहेलची मोटारसायकल क्रमांक एमएच ३४ बीजे ८२५ पार्किंगमध्ये उभी असल्याचे समजले. पण त्याच्या कुठे ही थांगापांगा मिळाले नाही.

वेकोलिच्या अधिकाऱ्यांनी या घटनेची तोंडी माहिती राजुरा पोलिसांना दिली आहे, मात्र बातमी लिहित पर्यंत कोणतेही तक्रार दिली नाही. खुल्या खदान संकुलातील जमीन खोदून सोहेल चे शोध घेतला जात आहे. पण वेकोलिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणावर बोलण्यास टाळाटाळ करत आहेत. या परिसरात कोळसा तस्कर, डिझेल, भंगार चोरांच्या सक्रिय कारवाया सुरू असल्याचे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून समोर आले आहे. वेकोली कामगार सोहेल खानचे अपहरण झाल्याची चर्चा परिसरात सुरू असून, त्याचे कुटुंबीय सोहेलच्या परत येण्याची वाट पाहत बसले आहेत, या घटनेने जिल्हा पोलीस प्रशासन व वेकोली सुरक्षा यंत्रणेचा पर्दाफाश झाला आहे. घटनास्थळी युद्धपातळीवर शोध सुरू असून घटनेची पाहणी करून बेपत्ता सुरक्षा गार्ड सोहेल खान माहिती घेतली जात आहे. प्रादेशिक व्यवस्थापक इलियास हुसेन शेख, उपप्रादेशिक व्यवस्थापक मोहन कृष्णन, सास्ती ओपन कॉस्ट चे एरिया सुरक्षा अधिकारी गौतम भगीरथ यांच्यासह अनेक वेकोलि आणि एमएसएफचे रक्षक उपस्थित असून, काही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे ठिकाणी व्यक्त होत आहे.

Latest Posts

Don't Miss