विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur) : बल्लारपूर क्षेत्र वेकोलि अंतर्गत विभागीय मुख्यालय व क्षेत्रीय रुग्णालयात सफाई काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमानुसार वेतन देण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाजप कामगार मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अजय दुबे यांनी दिला.
या संदर्भात अजय दुबे यांनी वेकोलि बल्लारपूरचे महाव्यवस्थापक सव्यसाची डे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली व स्थापत्य विभाग प्रमुख नायक यांची भेट घेऊन त्यांना कामगारांच्या समस्यांची माहिती दिली.
भाजप कामगार मोर्चाच्या निवेदनावर नायक यांनी कंत्राटदाराला नियमानुसार दोन दिवसांत पगार द्या, जुन्या लोकांना कामावर घ्या आणि सोमवारपासून कामाला सुरुवात करा, अन्यथा कायदेशीर कारवाईचा इशारा दिला.
यावेळी भाजप कामगार मोर्चाचे माजी विदर्भ सचिव श्रीकांत उपाध्याय, कामगार नेते अशोक सोनकर, कामगार नेते कुमार रावला, युवा नेते निखिल घुगलोत आदींची प्रमुख उपस्थिती होती.