Latest Posts

वेकोलिच्या गोवरी कोळसा साठ्यातून क्रश्ड कोळशाचा डीओ च्या नावावर घोटाळा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur) : बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या वेकोलिच्या सर्व खाणींमध्ये ट्रक युनियनची सत्ता असली तरी वेकोलिची सत्ता केंद्र सरकारकडून चालवली जात असली तरी स्थानिक खाणींमध्ये ट्रान्सपोर्ट युनियनचाच दबदबा दिसून येत आहे. कोळसा लोड करणे, केव्हा आणि कोठे हे स्थानिक युनियनद्वारे ठरवले जाते आणि त्या बदल्यात प्रत्येक ट्रकमधून ५०० ते १ हजार रुपये वैयक्तिक खर्चासाठी घेतात ज्याचा कोणताही हिशेब नाही.

त्याचप्रमाणे वेकोलिच्या गोवरी उपप्रादेशिक व्यवस्थापकाच्या डोळ्या देखत सुरू असलेल्या कोळशाचा काळा धंदा उघडकीस आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बंकर वरून गाळप कोळसा लोड करण्याचे डी.ओ. असताना कोळशाच्या साठ्यातून मोठ्या आकाराचा कोळसा निवडून हायवा ट्रकमध्ये भरला जात आहे, याशिवाय अमरावती, धुळे,  नागपूरच्या नावाने हायवा टिप्पर भरून चंद्रपूर आणि वणी येथील कोळसा ठेकेदार यांच्या भूखंडांवर रिकामे केले जात आहे. हे काम एक प्रकारे कोळसा चोरीचेच माध्यम असून ते स्थानिक अधिकाऱ्यांच्या गुप्त संमतीने सुरू आहे.

गोवरी खाणीतील अधिकाऱ्यांच्या संगनमताने दररोज रात्री अंदाजे वीस ट्रक कोळसा चोरीला जात असल्याच्या बातम्यांमुळे वेकोलिचे पूर्व उपप्रादेशिक व्यवस्थापक व पूर्व खाण व्यवस्थापक यांची बदली करण्यात आले होते. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत राष्ट्रीय संपत्ती म्हटल्या जाणाऱ्या काळ्या सोन्याच्या काळ्या बाजारीकरणाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

Latest Posts

Don't Miss