विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : व्येंकटरावपेठा येथील अहेरी रस्त्यावरील बतकम्मा उत्सव हे मोठ्या उत्सवाने साजरा करण्यात येते.
माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी काल या बतकम्मा मंडळाला भेट देत सदुला बतकम्माचे पूजन केले. यावेळी मंडळाने राजेंचे जोरदार स्वागत केले. लहानापासून मोठ्या पर्यंत सर्वांनीच राजेंसोबत छायाचित्रे घेतली.
यावेळी बोलतांना राजेंनी नवरात्र तथा बतकम्मा उत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या तसेच या पुढेही मंडळाला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले.
यावेळी माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी मंडळाच्या समस्या जाणून घेतल्या. या कार्यक्रमाला व्येंकटरावपेठा सह परिसरातील जनतेची तुडुंब गर्दी झाली होती.