Latest Posts

दक्षता जनजागृती सप्ताह २०२३ चे आयोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : महाराष्ट्र राज्यात प्रतिवर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ३१ ऑक्टोबर ला जन्मदिनाचे निमित्याने एक आठवडा दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. या वर्षी सप्ताहाची संकल्पना भ्रष्टाचाराला नाही म्हणा राष्ट्रासाठी वचनबध्द व्हा अशी ठेवण्यात आली आहे. त्याअनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर परिक्षेत्र अंतर्गत नागपूर शहर, नागपूर ग्रामिण, चंद्रपूर, भंडारा, वर्धा, गडचिरोली, गोंदिया या जिल्हांमध्ये ३० ऑक्टोबर २०२३ पासुन ०५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत दक्षता जनजागृती सप्ताह २०२३ चे आयोजन करण्यात येत आहे.

देश भ्रष्टाचार मुक्त झाला तर विकसित भारताचे उद्दिष्ट अधिक लवकर साध्य करता येईल. प्रत्येकाने भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी कटिबध्द होण्याचा संकल्प करण्याबाबत राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांनी सर्वांना आवाहन केलेले आहे.

या सप्ताहामुळे भ्रष्टाचाराची साखळी तोडण्यासाठी नागरिक जागरूक होतील. याचा विरोध करण्यासाठी त्यांचा सहभागही वाढेल. दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्य आपण सर्वांनी भ्रष्टाचार निर्मुलनाची प्रतिज्ञा घेवूया. देशाच्या विकासात आपला वाटा म्हणुन हा सप्ताह यशस्वी करण्यासाठी योगदान देवूया असे आवाहन मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी केलेले आहे.

दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्य आपण सर्वांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर परिक्षेत्र अंतर्गत सर्व कार्यालयांमध्ये ३० ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथ घेवून दक्षता जनजागृती सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. सदर सप्ताह दरम्यान विविध शासकीय कार्यालये, संस्था, शाळा, महाविद्यालय, आणि सार्वजनिक वर्दळीचे ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी आणि अंमलदार प्रत्यक्ष भेट देवून सामान्य नागरिकांमध्ये जनजागृती करणार असून आपआपसांतील मतभेद विसरून सर्वांनी एकत्रितपणे भ्रष्टाचाराविरुध्द लढा देण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.

तसेच याद्वारे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, तुम्हाला कोणी शासकीय कामाच्या बदल्यात लाचेची मागणी करीत असेल तर किंवा शासकीय कार्यालयात लाचेच्या अपेक्षेपोटी तुमचे कायदेशिर काम विनाकारण प्रलंबित ठेवत असेल तर किंवा तुम्ही केलेल्या कामाचे बिल मंजुर करून देण्याकरिता टक्केवारीने किंवा तुमच्या कडुन पैसे अथवा बक्षिस स्वरूपात इतर काही वस्तु लाचेच्या स्वरूपात मागणी करीत असेल तर खालील क्रमांकावर कॉल करून किंवा प्रत्यक्ष कार्यालयात भेट देवून लेखी तक्रार नोंदवावी.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे खालील क्रमांकावर संपर्क साधावा –
१. पोलीस अधीक्षक कार्यालय दुरध्वणी क्र. ०७१२-२५६१५२०
२. टोल फ्री क्रमांक : १०६४

Latest Posts

Don't Miss