Latest Posts

विसापूर फाट्याजवळ घडला बर्निंग दुचाकीचा थरार : चालत्या गाडी ने घेतला पेट

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur) : तालुक्यातील विसापूर येथील एक युवक गुरुवार सकाळी ११ वाजता दुचाकी घेवून विसापूर फाट्यावर जात असताना  अचानक दुचाकीने पेट घेतल्याची थरारक घटना घडली. यामध्ये दुचाकी पूर्णपणे जळून तिचा कोळसा झाला. या विचित्र घटनेमुळे वाहनचालक चांगलेच धास्तावल्याचे दिसून आले.

प्राप्त माहिती नुसार लोकेश ठेंगणे हा युवक आपली सेकंड हॅन्ड विकत घेतली दुचाकी बजाज पल्सर एम.एच.३४ बी.के.८७०१ ही घेवून काही कामा निमित्त विसापूर फाट्यावर जात होता. अचानक फॉरेस्ट नर्सरी जवळ धावत्या गाडीने पेट घेतली पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे तो गोंधळून गेला व त्याने दुचाकी तशीच टाकून सहाय्यता मागण्यासाठी टोल नाक्यावर धावला. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता अग्निशमन यंत्राने विझविण्याचा प्रयत्न केला परंतु खूप वेळ झाल्याने गाडी ९०% जळून खाक झाली होती. जवळपास दोन सिलेंडर गाडी विझविण्यासाठी लागले.

भर रस्त्यावर दुचाकी जळल्याचा थरार नागरिकांनी पहिला त्यामुळे वाहन चालकच चांगलेच धास्तावले. घटनास्थळावर प्रत्यक्षदर्शी पाहले त्यांनी सांगितल्या नुसार दुचाकीच्या स्टार्टर जवळील वायर स्पार्किंग मुळे धुवा दिसत होता व त्यामुळे गाडीने पेट घेतली असावी असा अंदाज वर्तविला. या बाबतची माहिती बल्लारपूर पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी भेट देऊन दुचाकीचा पंचनामा केला.

Latest Posts

Don't Miss