– जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा सांस्कृतिक उपक्रम
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur) : तालुक्यातील विसापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टेकडीचे वर्ग १ ते ४ शाळेचा सांस्कृतिक उपक्रम पार पडला. या सोहळ्यात चिमुकल्यांनी देशभक्ती, गोंडी नृत्य, लावणी नृत्य, धार्मिक नृत्य व चित्रपट गाण्यावरील नृत्याचे सादरीकरण करून पालकांना मंत्रमुग्ध केले. एकापेक्षा एक सरस नृत्याच्या सादरीकरणाने मान्यवरही चांगलेच भारावले.
विसापूर येथील टेकडी विभागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात पार पडलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाट्न सरपंच वर्षा कुळमेथे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रदीप लांडगे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून केंद्र प्रमुख नागेंद्र कुमरे, उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष ममता सातघरे, सदस्य योगेश निपुंगे, जिल्हा परिषद हायस्कूलचे मुख्याध्यापक दिनेश वरघणे, शिक्षक प्रतिनिधी प्रतिभा आवारी, सदस्य सचिव कलावती वानखेडे, अमोल खनके, अक्षय देशमुख यांची उपस्तिथी होती.
यावेळी मान्यवरांच्या उपस्थित वर्ग १ ते ४ च्या चिमुकल्यांनी सादरीकरण करण्यात आलेल्या सर्वच प्रकारच्या नृत्यावर चांगलीच धमाल केली. देशभक्ती पासून भारतीय संस्कृतीतील कलविष्कार नृत्याच्या माध्यमातून सादर केला. यावेळी पालकांचा सहभाग देखील होता. याचे उत्कृष्ट नियोजन मुख्याध्यपक कलावती वानखेडे, प्रतिभा आवारी, लिलावती नंदूरकर, निता वासाडे, विभा वैरागडे, स्वाती मेश्राम, मिनाक्षी कुमरे यांनी केले.