Latest Posts

विसापुरात ८५२ बालकांना पोलिओ डोजचे उद्दिष्ट : १८ केंद्राच्या माध्यमातून केली व्यवस्था

– आरोग्य केंद्रा अंतर्गत फिरते पथक देखील कार्यरत
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur) : महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राज्य पोलिओ मुक्त करण्यासाठी मोहीम राबवित आहे. या अनुषंगाने रविवारी पाच वर्षाखालील बालकांना पोलिओ डोज दिला. बल्लारपूर तालुक्यातील विसापूर प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत १८ केंद्राची व्यवस्था करण्यात आली. विसापूर आरोग्य केंद्राच्या हद्दीत तब्बल ८५२ बालकांना पोलिओ डोज देण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. कांचन आखरे यांनी दिली.

विसापूर प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत रविवारी पोलिओचे दोन थेंब पाच वर्षाच्या खालील बालकांना देण्याचा सुभारंभ उपसरपंच अनेकश्वर मेश्राम यांच्या हस्ते बालिकेला पोलिओची मात्रा देऊन करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. कांचन आखरे, आरोग्यसेविका अनिता सुंदरगिरी व आरोग्य कर्मचारी उपस्थितीत होते.

राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने राज्य पोलिओ मुक्त करण्याचा प्रयत्न सुरु केला. विसापूर आरोग्य केंद्राच्या अंतर्गत तब्बल ८५२ बालकांना पोलिओ डोज पाजण्याचे ध्येय निश्चित केले आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम यांच्या मार्गदर्शनात १८ पोलिओ केंद्राची व्यवस्था केली आहे. अन्य बालके देखील पोलिओ डोज पासून वंचित राहू नये, म्हणून फिरते पथक तैनात करण्यात आले आहे. उद्दिष्ट निर्धारित करण्यासाठी सर्वच बालकांना पोलिओ डोज पाजण्याचे नियोजन करावे, असी सूचना विसापूरचे उपसरपंच अनेकश्वर मेश्राम यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना केली.

Latest Posts

Don't Miss