Latest Posts

विय्यमपल्ली येथील आसमपल्ली कुटुंबाला आविसं अध्यक्ष बानय्या जनगाम यांच्याकडून आर्थिक मदत

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिरोंचा (Sironcha) : तालुक्यातील विय्यमपल्ली येथील आविसं कार्यकर्ता जंपय्या आसमपल्ली यांच्या आईची दीर्घ आजाराने मृत्यू झाली होती. त्यांच्या आत्मशांतीसाठी १६ ऑगस्ट २०२३ रोज बुधवारला तेरवीचे कार्यक्रम आयोजित केले होते.

तेरवीच्या कार्यक्रमाला आदिवासी विध्यार्थी संघटनेचे सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम व रायपेठा अविसं अध्यक्ष संतोष पडालवार यांनी बुधवारी होणाऱ्या तेरवीच्या कार्यक्रमाला आर्थिक मदत केले. तसेच आसमपल्ली कुटुंबियांना मोठ्या आस्थेने विचारपूस करून कुटुंबियांची सांत्वन केले.

यावेळी आविसं सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम, आविसं रायपेठा शाखा अध्यक्ष संतोष पडालवार, सरपंच सुरज गावडे, उपसरपंच वेंकटी दासरी, पानेम समय्या, जाडी नागेश, महेश कावरे, सूधाकर दुर्गम, कुमरी, मलय्या, रवी दुर्गम, रविदर रामेटके, असमपाली जंपय्या, सडवली कोंडागोर्ला, लक्ष्मण बोल्ले, गणेश राच्चावारसह विय्यामपल्ली परिसरातील आविसं व बीआरएस चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss